तुझ्यात जीव रंगला मालिकेतून रुपाली जगताप या महिला कॉन्स्टेबलची भूमिका साकारली आहे ‘मेघा पवार’ या अभिनेत्रीने. मेघा पवार मूळची पुण्याची, तिने एसएनडीटी स्कुल मधून शालेय शिक्षण तर एमइएस आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. अभिनयाची आवड असलेल्या मेघाने रंगभूमीवरील अनेक नाटकांतून विविधांगी भूमिका बजावल्या आहेत. ओम फट स्वाहा हे बालनाट्य तसेच “शिवपुत्र शंभूराजे” या महानाट्यातून तीला कधी सई बाई, येसूबाई, गोदावरी तर कधी झीनत अशी वेगवेगळी पात्रं साकारता आली. कार्टी नं १, गुरू अशी व्यावसायिक तसेच राज्यस्तरीय नाटकांतून तिला महत्वाच्या भूमिका मिळत गेल्या.

“प्रेमयोग” हा तिने साकारलेला पहिलाच मराठी चित्रपट, “तोलक – एक विदारक वास्तव” आणि “सासरची साडी” अशा आणखी काही मराठी चित्रपटातुन तिने प्रमुख नायिकेची भूमिका देखील बजावली आहे. नृत्याची तिला विशेष आवड, अनेक मंचावरून तिने लावणी नृत्य, कोळी नृत्यही सादर केले आहेत. “मनामधी प्रेमाचं काहूर उठतय” या म्युजिक व्हिडिओत देखील तीला झळकण्याची संधी मिळाली. अभिनयासोबतच मेधा एक मॉडेल म्हणूनही नावारूपास आली आहे. अनेक नावाजलेल्या ब्रँड तसेच व्यावसायिक जाहिरातींसाठी मॉडेल म्हणून तिने काम पाहिले आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेतून तिला रुपलीची भूमिका मिळाली. आपली ही भूमिका देखील तिने तिच्या अभिनयातून चांगलीच खुलवलेली पाहायला मिळते. अभिनयाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना तिने मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. मेघा पवारला तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *