” तुझं माझं ब्रेकअप ” मालिकेतील समीरची आई म्हणजेच “राधिका विद्यासागर” यांची फॅमिली पाहण्यासाठी

राधिका विद्यासागर मूळच्या पुण्याच्या , कर्नाटक हायस्कुल मधून त्यांनी शिक्षण घेतले , तर पुणे युनिव्हर्सिटी मधीन त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. ” तुझं माझं ब्रेकअप ” या मालिकेतील त्यांची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. या मालिकेआधी त्यांनी ” पुढचं पाऊल ” या स्टार प्रवाहवरील मालिकेत रुपालीची आई म्हणजेच कंचनमाला रणदिवे साकारली होती. मालिका भरभराटीला येत असतानाच थोड्याच दिवसात त्यांनी काही कारणास्तव या मालिकेचा निरोप घेतला होता.

पुढे हिंदी मालिका आर के लक्ष्मण कि दुनिया ही सब टीव्हीवरील तसेच शास्त्री सिस्टर्स कलर्स वाहिनीवरील मालिकेत त्या झळकल्या. ” या वळनावरून ” या मालिकेत देखील त्यांनी उत्तम भूमिका साकारली आहे. “अलिबाबा आणि चाळिशीतले चोर ” हे त्याचे नाटक तुफान गाजले. F.U , कंडिशन्स अप्लाय या चित्रपटात त्यांना अभिनयाची संधी मिळाली.

राधिका यांच्या पतीचे नाव निरंजन विद्यासागर. निरंजन हे देखील मूळचे पुण्यातीलच आहेत. ओघेही कामानिमित्त मुंबईत येऊन स्थायिक झाले. त्या दोघांना “सई” नावाची मुलगी आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *