सतीश राजवाडे दिग्दर्शित “ती सध्या काय करते ” चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता आणि हा चित्रपट तितकाच हिट देखील झाला होता. अभनय बेर्डे, आर्या आंबेकर, तेजश्री प्रधान, अंकुश चौधरी अशी भली मोठी स्टार कास्ट या चित्रपटाला लाभली होती. चित्रपटात “ईशा फडके” या अभिनेत्रीने मोहिनीची छोटीशी भूमिका साकारली होती ही भूमिका छोटी जरी असली तरी ती प्रेक्षकांच्या तितकीच स्मरणात राहीली होती. या चित्रपटातील दोन गाणी तहिच्यावर चित्रित झाली होती. आज या अभिनेत्रीबद्दल आणखीन जाणून घेऊयात…

अभिनेत्री ईशा फडके ही मूळची पुण्याची. वाकड येथील इंदिरा कॉलेजमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले. ती सध्या काय करते हा ईशाने अभिनित केलेला पहिलाच चित्रपट त्यानंतर ईशा मात्र कुठल्याही चित्रपटात पाहिली गेली नाही. असे असले तरी ईशा आता नृत्यशैलीत चांगलीच रुळलेली पाहायला मिळते आहे. नृत्य शिक्षिका शांभवी दांडेकर यांच्याकडून तिने कथकचे धडे गिरवले आहेत. गंधर्व महाविद्यालय मुंबई येथून नृत्य विशारद पदवी तीने प्राप्त केली आहे. ‘शांभविज इंटरनॅशनल स्कुल ऑफ कथक’ इथे ती आपल्या शिष्याना नृत्य शिकवण्याचे काम करते. कथक सोबतच ईशाने साल्सा, लॅटिन-अमेरिकन आणि बॉलरूम डान्सफॉम् मध्ये देखील प्राविण्य मिळवले आहे.

प्रसिद्ध डान्स मास्टर रॉकी पुणावाला यांच्याकडून तिने या नृत्य शैलीचे प्रशिक्षण घेतले. नोव्हेंबर २०१० साली झालेल्या सिंगापूर इंटरनॅशनल साल्सा फेस्टिव्हल मध्ये मास्टर पुणावाला यांच्या मार्गदर्शनाखाली तिने असिस्टंट म्हणून काम पाहिले होते. त्याच वर्षी डान्स स्पोर्ट महाराष्ट्र चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होऊन चौथा क्रमांक पटकावला होता. बॉलिवूड चित्रपट आणि जाहिरातींसाठी तिने कोरिओग्राफर म्हणूनही काम पाहिले आहे. “ईशान्यज” या संस्थेमार्फत अनेक शिष्यांना तीने नृत्याचे धडे दिले आहेत. २८ फेब्रुवारी २०१७ रोजी ईशा फडके हिने अंबर गोखले सोबत लग्न केले. अंबर गोखले हा तबला वादक आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमात त्याच्या या कलेचे दर्शन रसिकांना अनुभवण्यास मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *