तीन बायकांनी मिळून केली आपल्याच नवऱ्याची फजिती. चौथ्या लग्नात असा पकडला कि…

ही घटना आहे सोलापुरातील. प्रकाश जगनगवळी नावाचा हा इसम चक्क एक दोन नव्हे तर चौथ्या लग्नाच्या तयारीत होता. पैसे कसे कमवायचे ही नामी शक्कल त्याने काशी लढवली हे पाहून तर तुम्ही नक्कीच अवाक व्हाल. प्रकाशने याआधी २००६ साली पहिले लग्न केले होते. लग्नाच्या काही दिवसातच रिक्षासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीकडे तगादा लावला. अनेकदा तिला मारहाण करून घर सोडण्यास भाग पाडले. पहिली पत्नी सोडून गेल्यानंतर प्रकाशने दुसऱ्या लग्नाचा घाट घातला. बीएसएनएल मध्ये क्लार्क असल्याचे सांगून त्याने पुण्यातील मुलीशी २०१५ साली भरभक्कम हुंडा घेऊन दुसरे लग्न केले.

परंतु त्यानंतर काही दिवसांनी दुसऱ्या पत्नीला देखील त्रास द्यायला सुरुवात केल्यावर ती घर सोडून निघून गेली. ह्याच संधीची वाट पाहणाऱ्या प्रकाशने पुन्हा तिसरे लग्न केले. पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीप्रमाणेच तिसरीला देखील त्याने असाच त्रास देण्यास सुरुवात केली. परिणामी तिने देखील प्रकाशपासून दूर राहणे पसंत केले.
परंतु एवढे करूनही हा भामटा गप्प बसेल तर शप्पथ, त्याने पुन्हा चौथ्या लग्नाचा घाट घातला. इथे मात्र ही बाब ह्या तिघींपैकी एकीला समजली. मग तिघीनी एकत्र येऊन प्रकाशाच्या चौथ्या लग्नावेळी गोंधळ घातला आणि हे चौथे लग्न करण्यापासून त्याला थांबवण्यात आले. या गोंधळामुळे प्रकाशने तेथून पळ काढला. परंतु हा भामटा आणखी कोणासोबतही लग्न करून तिचे आयुष्य बरबाद करणार हे जाणून असल्याने त्याला ताबडतोब पकडण्याची मागणी करण्यात आली आहे. लवकरात लवकर हा भामटा पकडला जावा जेणेकरून तो कोणालाही यापुढे फसवू शकणार नाही. सोशल मीडियावर त्याचे फोटोदेखील व्हायरल करण्यात आले आहेत. हे फोटो चक्क चौथ्या होणाऱ्या पत्नीला टॅग करण्यात आले आणि अखेरीस त्याच भांड फुटलं आणि तो गजाआड झाला.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *