तांब्याच्या भांड्यात ह्या पाच वस्तू चुकूनसुद्धा ठेऊ नका..

पाण्याला ‘जीवन’ असं संबोधलं जातं म्हणूनच निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शारीरिक स्वास्थ्यासाठी हेच पाणी अनशेपोटी तांब्याच्या भांड्यत ठेऊन पिल्यास त्याचा अधिक फायदा होतो. आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कफ,पित्त,वात) असते. तांब्याच्या या नैसर्गिक जंतुनाशक गुणामुळे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असते. परंतु काही जणांना वाटते कि तांब्याच्या भांड्याच्या या फायद्यामुळे त्यात आणखीही काही वस्तू ठेवल्यास त्याचा लाभ होईल. तर असे चुकूनही करू नका. कारण तांब्याच्या भांड्यात या पुढील ५ पदार्थ ठेवल्यास तुमच्या आरोग्याला हानिकारकच आहेत. पहा कोणते आहेत हे पाच पदार्थ…

१. दही –

दह्यात अणेक पोषक तत्वे असतात परंतु तांब्याच्या भांड्यात दही ठेवणे तुम्हाला अपायकारक ठरू शकते. यामुळे तुम्हाला फूड पॉइजनिंग होऊ शकते . त्यामुळे दही हे नेहमी सध्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यात ठेवल्यास उत्तम.

२. दूध-

तांब्याच्या भांड्यात दूध ठेवल्यास त्यातील पोषकतत्वावर दुष्परिणाम होऊन डायरियाचा त्रास सुरू होतो. दूध हे नेहमी काचेच्या किंवा स्टील च्या भांड्यात ठेवावे.

३. लोणचे –

तांब्याच्या भांड्यात लोणचे ठेवल्यास, धातू आणि लोणच्याचा सार यांची रासायनिक प्रक्रिया होऊन लोणचे खराब होते आणि त्यामुळेच हे लोणचे शरीरासाठी अपायकारक बनते. त्यामुळे लोणचे मातीच्या बरणीत किंवा काचेच्या अथवा प्लॅस्टिकच्या बरणीतच ठेवावे.

४. लिंबु –

लिंबाचं सरबत, कापलेलं लिंबू किंवा लिंबाचं पाणी तांब्याच्या भांडयात ठेऊ नका. लिंबामध्ये ऍसिड असते त्यामुळे धातूशी संपर्क होऊन पदार्थाला विष बनवते त्यामुळे हे पदार्थ नुकसानदायकच ठरते.

५. व्हिनेगर –

व्हिनेगर हादेखील अमली पदार्थच आहे. हा पदार्थ तांब्याच्या भाड्यात ठेवल्यास त्यामुळे निर्माण होणारी रासायनिक क्रिया तुमच्या शरीराला नुकसानदायक ठरते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *