हेमा मालिनी आणि धर्मेंद्र हि जोडी बॉलीवूड मधील एक दिग्गज जोडी म्हणून ओळखली जाते. चित्रपट करताना ह्या दोघांची ओळख झाली आणि बघता बघता दोघांनी लग्न देखील केलं. पण ह्या दोघांच्या लग्नामुळे त्यावेळी वाद विवाद निर्माण झाले. त्याचं कारण देखील अगदी तसंच होत. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्या सोबत १९५४ साली झालं होत. त्यावेळी धर्मेंद्र फक्त १९ वर्षांचे होते. आपला पती धर्मेंद्र हा हेमा मालिनीशी लग्न करतोय हे समजताच त्यांनी ह्या लग्नाला साफ नकार दिला होता. इतकंच नव्हे तर त्या धर्मेंद्र पासून विभक्त होण्यासाठी देखील तयार नव्हत्या.

हिंदू धर्मात पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही. ह्या कारणामुळेच धर्मेंद्र ने मुस्लिम धर्म स्वीकारून हेमा मालिनी हिच्याशी लग्न केलं. नुकत्याच एका इंटरव्यूमध्ये त्यांनी काही गोष्टी उघड केल्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या धर्मेंद्र आणि मी ज्यावेळी भेटलो तेव्हा वाटलं कि आम्ही एकमेकांसाठीच बनलेलो आहोत. पण मला असं मुळीच वाटत नव्हतं कि धर्मेंद्र आणि माझ्या लग्नामुळे त्याच्या पहिल्या पत्नी आणि मुलांपासून तो दूर जावा. मी लग्न तर केलं पण त्याला पहिल्या पत्नीपासून कधीच दूर केलं नाही. मी त्यांच्या जीवनात कधीही अडथळा येऊ दिला नाही. माझ्यासोबत माझ्या मुली आणि त्यांचे पती आहेत त्यामुळे मला मी कधीच एकटी असल्याचं वाटत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *