तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या नाम फौंडेशनकडे वाटचाल सुरू केली आहे. नुकत्याच मंगळवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत तनुश्रीने नाम फाउंडेशन मध्ये जे फंडिंग केलं जातं त्याचा हिशोब कोणीच ठेवत नाही आणि याची कोणकडूनच वीचारणा देखील केली जात नसल्याचे म्हटले आहे. यात तिने म्हटले की, नाना पाटेकर यांचे वकील निलेश पावसकर यांनी मला धोका देऊन माझ्याकडची सगळी कागदपत्र घेऊन गेले. ते नाना पाटेकर यांचे वकील होते हे मला माहित नव्हते. त्यांचे वकीलही मला नेहमीच त्रास देतात.

त्यांनी माझे करिअर संपवले. कोणताही बॉलिवूड कलाकार आज माझ्या सोबत नाहीये परंतु मी तरीही गप्प बसणार नाही मी कुठल्याही परिस्थितीत केस मागे घेणार नाही. यासोबत ती असेही म्हणते की नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशन उभारले, मी किती गरीब आहे, मी एका साध्या घरात राहतो अशी लोकांच्या मनात त्यांनी आपली इमेज तयार केली आहे परंतु हे सगळं खोटं आहे, शेतकऱ्यांच्या नावाने आणि नाम फाउंडेशनद्वारे हे करोडो रुपये जमा करतात. हे सगळे पैसे नेमके कुठं जातात? पुढे ती असेही म्हणते की, ‘मी काही महिन्यांपूर्वी असे ऐकले होते की गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी ते ५०० घरं बांधत आहेत. कुणी जाऊन पाहिलं का ती घरं खरंच बनली आहेत की नाहीत? वर्षातून एकदा प्रेस कॉन्फरन्स बोलावतात त्यात २०० विधवांना बोलावून १५ हजार रोख रक्कम, दोनशे- पाचशे रुपयांची साडी आणि शिलाई मशीन देऊन फोटो काढतात. तुम्ही करोडो रुपये फंडिंग जमा करता आणि त्यातले एवढेच गरिबांना देता. तुमचा सगळ्यांचा या गोष्टीवर विश्वास असेल परंतु मी इंटेलिजंट आहे, माझा यावर अजिबात विश्वास नाही.

परदेशातून अनेकांकडून नाम फाउंडेशनच्या नावाने २० ते २५ लाखांचे फंडिंग केले जाते. त्यांच्या नाम फाउंडेशनच्या वेबसाईटवर कधीच काही अपडेट केलं जात नाही. केवळ एक एनजीओ स्थापन करायचं आणि आरामात बसून जगायचं…याबाबत कोणीही कधीच विचारपूस देखील करत नाही कारण त्यावर एनजीओचा शिक्का लागलेला असतो. लोकांची तोंड गप्प राहण्यासाठी त्यांना खाऊ घालून खुश ठेवायचं. हे सर्व पैसे त्या गरीब कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे आहेत.’ तनुश्री दत्ताच्या प्रेसकॉन्फरन्स नंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्या आहेत यावेळी अनेकांनी ‘ आम्ही नानांना अगदी लहानपणापासून ओळखतो, नाना किती साधे आणि सरळ आहेत ते आम्हाला ठाऊक आहे’ अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. उलट तू हे जे काही नाटकं चालवली आहेस ती आधी बंद कर. तुझ्या चित्रपटातील तुझी कामं आम्ही पाहिली आहेत तेव्हा तू या विषयावर न बोललेलंच बरं. अशा स्वरूपाच्या बऱ्याच प्रतिक्रिया आता तनुश्रीच्या विरोधात जोर धरताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *