“आयुष्यावर बोलू काही” हा मराठी कविता आणि गाण्यांचा कार्यक्रम आबालवृद्धांच्या पसंतीस उतरला आहे. डॉ सलील कुलकर्णी आणि संदीप खरे हे या कार्यक्रमाचे आयोजन करतात. परंतु याच नावावरून त्यांनी एक निषेध नोंदवणारी पोस्ट शेअर केली आहे. “गर्ल्स ” या चित्रपटातील मुलीच्या टीशर्ट वर ‘आयुष्यावर बोलू काही’ असे लिहिले आहे तो टीशर्ट घातलेली अभिनेत्री असभ्य हालचाली करत असल्याचे या चित्रपटात दर्शवले आहे. डॉ सलील कुलकर्णी यांना ही बाब खटकली असून त्यांनी या चित्रपटाबद्दल आक्षेप नोंदवून निषेध दर्शवला आहे. गेली १६ वर्षाहून अधिक काळापासून हाऊसफुल गर्दी खेचून आणणाऱ्या आमच्या कार्यक्रमाचा हा अपमान आहे असे त्यांनी यात म्हटले आहे.

सलील कुलकर्णी सोबत , संदीप खरे, आदित्य आठल्ये, रितेश ओहोळ यांनीही या भूमिकेला दुजोरा देत तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे यामुळे तूर्तास या चित्रपटाचे प्रदर्शनापूर्वीच वाद निर्माण झाले आहेत .१५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे तसाही हा चित्रपट बोल्ड असल्याचेच म्हटले जाते. बॉईज चित्रपटाच्या यशानंतर मुलींवर आधारित गर्ल्स चित्रपटाची सगळीकडे चर्चा होत आहे परंतु सलील कुलकर्णी यांनी नोंदवलेल्या निषेधामुळे हा चित्रपट वादात सापडला आहे. हा सलील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा आणि आमच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांचा अपमान आहे त्यामुळे आम्ही ह्या सिनेमाचा तीव्र निषेध करतो असं सलिलच मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *