झी वाहिनीच्या अग्गबाई सासूबाई मालिकेमुळे डॉ गिरीश ओक यांना अभिजित राजे म्हणूनच ओळखले जाते. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. झी वाहिनीच्या अग्गबाई सासूबाई हि मालिका मराठी वाहिनीवरील तिसऱ्या नंबरची प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका बनली आहे. मालिकेतील अभिनजीत राजे म्हणजेच डॉ गिरीश ओक यांच्या खाजगी आयुष्याबद्दल खूपच कमी जणांना माहीत आहे. त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात…

डॉ गिरीश ओक हे मूळचे नागपूरचे. पुरुषोत्तम इंग्लिश मिडीयम शाळेतून त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर गव्हर्नमेंटच्या आयुर्वेदिक कॉलेजमधून डॉक्टरची पदवी प्राप्त केली परंतु हे आपले क्षेत्र नाही हे लक्षात येताच त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. दामिनी, दुहेरी, बंदिनी, जुळून येति रेशीम गाठी अशा विविध मालिकेत दमदार भूमिका गाजवल्या. गिरीश ओक यांनी पद्मश्री फाटक यांच्यासोबत आपला संसार थाटला. त्यांची मुलगी गिरीजा ओक हिने देखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनयाची वाट धरली. मराठी सिने सृष्टीत मोलाचे योगदान देत तिने हिंदी मालिका, चित्रपट तसेच जाहिरातीत आपली चुणूक दाखवून दिली. सुहृद गोडबोले याच्या सोबत गिरीजा विवाहबंधनात अडकली.

गिरीजाचे लग्न होण्याआधी म्हणजेच २३ मार्च २००८ रोजी गिरीश ओक यांनी पल्लवी हिच्यासोबत दुसरे लग्न केले. गिरीजाच्या लग्नावेळी त्या दोघांनीही हजेरी लावली होती. गिरीश आणि पल्लवी ओक यांना दुर्गा नावाची मुलगी आहे. दुर्गा कथक शिकत आहे याशिवाय तिला इलेक्ट्रॉनिक कीबोर्डची आवड आहे. त्रिणीटी कॉलेज लंडन येथून तिने प्राविण्य मिळवले आहे. सध्या हे कुटुंब मुंबईत स्थायिक आहे. गिरीश ओक गणपतीचे खूप मोठे भक्त आहेत त्यामुळे त्यांच्या घरी गणरायाचे भरमसाठ फोटो आणि मूर्ती पाहायला मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *