डॉ अमोल कोल्हे “स्वराज्य रक्षक संभाजी” मालिका सोडण्याबाबत काय म्हणाले एकदा वाचाच

” स्वराज्यरक्षक संभाजी” ही झी मराठी वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून आजतागायत आपले स्थान रसिकांच्या मनात टिकवून ठेवले आहे. आपल्या राजाचा इतिहास प्रत्यक्षात अनुभवायला मिळाले असल्याचे भाग्य अनेक रसिकांनी आपल्या भावनांतून व्यक्त केले. हा इतिहास असाच पुढेही सजग व्हावा म्हणून मालिकेतील सर्वच जबाबदार व्यक्तींनी ही धुरा अतिशय चोख बजावलेली पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच डॉ अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या ह्या निर्णयामुळे अनेकांनी त्यांच्या मालिकेतील भूमिकेबाबत तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केलेली पाहायला मिळते.

राजकारणात सक्रिय राहण्यासाठी आता डॉ अमोल कोल्हे मालिका सोडणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर पासरताना दिसत आहेत. परंतु स्वतः डॉ अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेऊन याबाबत उलगडा केला आहे की, ते “स्वराज्यरक्षक संभाजी” ही मालिका अगदी शेवटपर्यंत अशीच साकारणार आहेत. मालिका सोडणार ह्या केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
“नमस्कार! आता News Channel वरून ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरत आहेत त्यापैकी कोणत्याही प्रकारच्या बातमीवर विश्वास ठेवू नका हि नम्र विनंती. मालिका सोडण्याचा कोणताही निर्णय किंवा विचारही झालेला नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतून जगासमोर मांडण्याचे कार्य अविरत चालू राहील!
धन्यवाद!” मालिकेतुन छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जनतेसमोर मांडण्याचे कार्य अविरत चालूच राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. डॉ अमोल कोल्हे ह्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नुकताच प्रवेश केला. त्यांच्या ह्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले तर अनेकांना ते बिलकुल रुचले नसल्याचे सोशल मीडियावर दिसून आले. ह्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या मालिकेतील अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ह्याबाबत त्यांनीच स्वतः खुलासा केल्याने तुर्तास या बातमीला आळा बसेल एवढे निश्चित.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *