“ठाकरे” चित्रपटातील बाळासाहेबांच्या आवाजाला “या” कलाकाराचा आवाज द्या

” ठाकरे” चित्रपट येत्या २५ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी या अभिनेत्याने बाळासाहेब ठाकरे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर त्यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची भूमिका अभिनेत्री अमृता राव हिने साकारली आहे. नुकताच या सिनेमाचा दमदार ट्रेलरही लॉन्च झाला आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिजित पानसे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच हा चित्रपट हिट होणार यात शंका नाही

परंतु चित्रपटातील बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील करारेपणा कुठेतरी पुसटसा जाणवू लागत असल्याने नेटकऱ्यांनी बाळासाहेबांच्या आवाजाला “चेतन सशीतल” या कलाकाराच्या आवाजाची मागणी केली आहे. चेतन सशीतल हे आवाजाचे जादूगार म्हणून सर्वपरिचित आहेत. आजवर त्यांनी अनेक मंचावर आपली आवाजाची कला सादर केली आहे. सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन,अमरीश पुरी, शाहरुख खान,यांच्यापासून ते जाहिरात क्षेत्र, कार्टून कॅरॅक्टर अशा अनेकांना आवाज देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यामुळे खुद्द बाळासाहेबांनीच या कलाकाराला बोलावून आपला आवाज काढून दाखव असे म्हटले होते. तेव्हा चेतन यांनी बाळासाहेबांचा हुबेहूब आवाज काढून त्यांना आश्चर्य चकित केले होते. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने देखील ह्या बाबीवर आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे होते असे बऱ्याच जणांचे म्हणणे आहे. त्यामुळे या बाबीवर चित्रपटाचे दिग्दर्शक पुढे निर्णय घेतील का हे लवकरच स्पष्ट होईल.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *