‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटाचा ट्रेलर पहा .. बाहुबलीचे सगळे रेकॉर्ड धुळीत मिळणार

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ ह्या चित्रपटाकडे सगळ्या बॉलीवूडच लक्ष लागलाय. २०१८ ह्या संपूर्ण शाळांमध्ये एकही चित्रपट बॉक्स ऑफिस वर टिकू शकला नाही. पण ह्या ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या फक्त एका ट्रेलरमुळे यश राज फिल्मस पुन्हा एकदा चर्चेत आलीय. ह्या चित्रपटाच्या ट्रेलरला तब्बल ४ कोटी लोकांनी युट्यूब वर हजेरी लागलीय. ह्या चित्रपटाचं एकूण बजेट हे २५० कोटींच्या घरात गेलंय, त्याच कारणही तसेच आहे. चित्रपटात आमिर खान आणि अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत तर यांच्यासोबतच या चित्रपटात सना शेख आणि कॅटरिना कैफ ह्या देखील पाहायला मिळणार आहेत.


नुकतच युट्यूबने ह्या चित्रपटाचे राईट आपल्या युट्यूब मुव्हीज वर टाकण्यासाठी तब्बल ८०० कोटींची बोली लावल्याचेही उघड झालेय. पण यश राज फिल्म्सने एवढी मोठी ऑफर हि धुडकावून लावल्याचे समजते. ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपट फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित आहे.चित्रपट दिवाळीत रिलीज होतोय त्यामुळे हा ह्या गतवर्षीच्या सर्वात मोठा चित्रपट असल्याचे भासते.
यश राज फिल्म्स याना ह्या चित्रपटापासून तब्बल २५०० कोटींची अपेक्षा आहे. चित्रपट भारताबाहेर २२ देशांत आणि १२ भाषेत प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं जातंय यात इंग्रजी चिनी, जपानी आणि अरबी भाषेत डबिंग करून झालंय. प्रेक्षक चित्रपटासाठी उत्सुक तर आहेतच पण १७९५ ची हि कहाणी लोकांना किती आवडणार हे आणि चित्रपट किती यशस्वी होईल हे वेळच ठरवेल.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *