टॉलिवूडच्या या ५ भावांची जोडी…एक ‘सुपरस्टार’ तर दुसरा ‘सुपरफ्लॉप’…पाहण्यासाठी

बॉलिवूड प्रमाणेच टॉलिवूडच्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून विशेष पसंती दिलेली पाहायला मिळते. कॉमेडी, ऍक्शन, रोमँटिक सिनने परिपूर्ण असलेल्या टॉलिवूडच्या चित्रपटाचे हटके कथानक तरुणांना आकर्षित करण्यात यशस्वी झालेले पाहायला मिळतात. बॉलिवूड प्रमाणेच टॉलिवूडमध्ये देखील स्टार भावांच्या जोड्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. परंतु प्रत्येकालाच तिथे यश मिळतेच असे नाही. म्हणूनच एक भाऊ जर सुपरस्टार असेल तिथे दुसरा भाऊ सुपरफ्लॉप झालेला पाहायला मिळतो आहे. पाहुयात टॉलिवूडच्या या सुपरस्टार आणि सुपरफ्लॉप भावांच्या जोड्या…


१. अल्लु अर्जुन आणि व्यंकटेश- टॉलिवूड सुपरस्टार म्हणून अल्लु अर्जुन या अभिनेत्याने आपली एक वेगळी छाप रसिकांच्या मनात पाडली आहे. अभिनय आणि हटके स्टाईलमुळे अल्लु अर्जुन रसिकांचा ताईत बनला आहे. आजवर त्याच्या कारकिर्दीत त्याने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे साकारले आहेत. लकी द रेसर, सरायनाडू, डीजे सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे साकारून त्याने टॉलिवूड प्रेक्षकांनाच नाही तरी देशभरातील चाहत्यांच्या संख्येत वाढ केली आहे. एकीकडे सुपरस्टारचा शिक्का मिळालेल्या अल्लु अर्जुनाच्या भावाला म्हणजेच व्यंकटेशला सुपरफ्लॉप म्हटले जाते. व्यंकटेशने टॉलिवूडच्या काही मोजक्या चित्रपटात काम केले असले तरी त्याला आपल्या भावाप्रमाणे म्हणावे तसे यश मिळाले नाही.


२. नागा चैतन्य आणि अखिल- नागा चैतन्य आणि अखिल हे टॉलिवूड सुपरस्टार नागार्जुन यांची मुले आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मुलांनी देखील याच क्षेत्रात येण्याचे धाडस दाखवले. एकीकडे नागा चैतन्य याने अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे साकारले त्यामुळे त्याला टॉलिवूडमध्ये सुपरस्टारचा दर्जा मिळाला असला तरी धाकटा भाऊ अखिल मात्र सुपरस्टार बनण्यापासून वंचित राहिलेला पाहायला मिळाला. काही मोजके चित्रपट साकारून अखिल फ्लॉपच्या यादीत जाऊन बसला.


३.सूर्या आणि कार्ति- दाक्षिणात्य जगतातील सिंघम म्हणून ओळखला जाणारा सूर्या सुपरस्टार म्हणून परिचित आहे. सूर्याने आजवर दाक्षिणात्य सिनेमात आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. त्याचे सिंघम, चेन्नई बनाम चीन सारखे ब्लॉकबस्टर सिनेमे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले . तर दुसरीकडे सूर्याचा भाऊ कार्ति अनेक चित्रपट साकारताना पाहायला मिळाला असला तरी आपल्या भावाप्रमाणे म्हणावे तितके यश त्याला मिळाले नाही.


४.चिरंजीव आणि पवन- दाक्षिणात्य मेगास्टार अभिनेता म्हणून चिरंजीवी यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूड मध्येही त्यांनी मोजके चित्रपट साकारले असले तरी त्या चित्रपटांना भरपूर पसंती मिळालेली दिसते. तर दुसरीकडे चिरंजीवी यांचे बंधू पवन यांना टॉलिवूड मध्ये स्वीकारले असले तरी चिरंजीवी प्रमाणे फारसे यश मिळाले नाही. पवन सध्या राजकारणात देखील सक्रिय झालेले पाहायला मिळतात.


५. एन टी आर- ड्रामा आणि ऍक्शन सिनने भर घातलेल्या ज्युनिअर एन टी आर च्या चित्रपटांना विशेष पसंती मिळते. बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करून देणाऱ्या ज्युनिअर एन टी आरचा भाऊ मात्र फ्लॉप ठरला.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *