झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा प्रताप पुण्यातील बहिलेने दिलेली ऑर्डर पूर्ण केली पण जाताजाता

पुण्यात नुकतीच एक कुत्रा पळवून नेण्याची घटना घडली आहे. या कुत्र्याचे नाव आहे डॉट्टू. डॉट्टू हा बिगल प्रजातीचा कुत्रा आहे. ही घटना सोमवारी म्हणजेच ७ ऑक्टोबर पुणे ,कर्वेरोड डेक्कन परिसरात घडली असून डॉट्टूची मालकीण वंदना शहा यांनी ही बाब सोशल मीडियावरून निदर्शनास आणून दिली आहे. आणि याबाबत मदतीचे आवाहन देखील केले आहे. बराच वेळ शोध घेऊनही डॉट्टू चा तपास न लागल्याने वंदना शहा यांनी फॅक्टरी कॉम्प्लेक्स मधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. डॉट्टू हा त्याच परिसरात खेळत असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले होते. त्यानंतरही डॉट्टू सापडत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली होती.

शहा कुटुंबाने घराच्या बाजूला असलेल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन चौकशी केली. तिथल्या डिलिव्हरी बॉय पैकी एकाने डॉट्टूला ओळखले आणि तो आपल्या एका सहकाऱ्याकडेच असल्याचे सांगितले. त्या डिलिव्हरी बॉयचे नाव तुषार असून त्यांनी त्याच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. तुषारने यावेळी उडवाउडवीची उत्तरे देत आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. शहा कुटुंबाने पैसेही देऊ केले परंतु त्या डिलिव्हरी बॉयने डॉट्टूला गावी पाठवल्याचे सांगितले. दरम्यान यासंदर्भात त्यांनी झोमॅटोकडेही मदत मागितली परंतु त्यांच्याकडूनही कुठलीच हालचाल होत नसल्याचे पाहून अखेर हताश होऊन आपला डॉट्टू परत मिळवण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत पेटा संस्थेला टॅग करून मदतीचे आवाहन केले आहे. अल्पावधीतच त्यांचे हे ट्विट खूपच वेगात व्हायरल होताना दिसत आहे. सर्वच स्तरातून अशा घटनेला नागरिकांकडून विरोध दर्शविला जात आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *