devendra dev actress wifes

बऱ्याच महिन्यांनंतर माझ्या नवऱ्याची बायको हि मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आली त्याचबरोबर मालिकेतील जुनी शनया म्हणजेच अभिनेत्री रसिक सुनील हिचे देखील पुन्हा पदार्पण झालेले पाहायला मिळाले. गुरुनाथची पहिली पत्नी राधिका हिने सौमित्राशी लग्न केलं आणि गुरुनाथ सौमित्रच्या वडिलांच्या कंपनीत सामील होऊन कारभार सांभाळणार आहे पुढे तो काहीतरी कट कारस्थान करणार हे निश्चित. मालिकेतील गुरुनाथ सुभेदार याच्या वडिलांची भूमिका अभिनेते “देवेंद्र दोडके” यांनी साकारली आहे. देवेंद्र दोडके हे केवळ अभिनेतेच नाही तर ते एक उत्तम दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. आपण याआधीही त्यांना कित्तेक मालिका आणि चित्रपटात त्यांना पाहिलं असेलच.

devendra dev actors wife
devendra dev actors wife

देवेंद्र दोडके हे मूळचे नागपूरचे त्यामुळे त्यांचे शिक्षण नागपूर येथील नवप्रतिभा हायस्कुल मधून झाले .नागपूर युनिव्हर्सिटी मधून त्यांनी आपले पुढील शिक्षण प्राप्त केले. शिवसाई एंटरटेनमेंट मध्ये ते कार्यरत आहेत. ‘ते दोन दिवस ‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन करून एक उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. सह्याद्री वाहिनीवरील “संजीवनी, ऊन सावली” या दोन्ही मालिकांचे दिग्दर्शन करून अभिनयाची धुराही सांभाळली आहे.केतकी माटेगावकर हिच्या ” तानी ” या चित्रपटात देवेन्द्र यांनी सुखदेव ची भूमिका पार पाडली. त्यानंतर लाल चुडा, माझी शाळा, फोर इडियट्स , मिस लव्हली या चित्रपटात अभिनय साकारला. “प्रतिशोध कुंकवाचा” या भावनाट्यात त्यांनी सुरेख भूमिका साकारली आहे. देवेंद्र दोडके यांच्या पत्नीचे नाव दीपाली असे आहे. दीपाली दोडके यांनी कोल्हापूर युनिव्हर्सिटी मधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. देवेंद्र आणि दीपाली या दोघांनी “शिर्डी साई” चित्रपटामध्ये अभिनय साकारला आहे. या चित्रपटात देवेंद्र यांनी श्यामा, तर दीपाली यांनी राधाबाई यांची भूमिका साकारली आहे. साऊथ सुपर स्टार नागार्जुन या चित्रपटात साईबाबांच्या भूमिकेत दिसले होते. देवेंद्र आणि दीपाली यांना देवांशु नावाचा मुलगा आहे. देवांशु हाही नवोदित कलाकार आहे. नुकताच देवांशुने एक मराठी शॉर्टफिल्म बनवलीय त्यात त्याने अभिनयाबरोबर डायरेशनही केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *