झी मराठी प्रेक्षकांसाठी हि आनंदाची बातमी ह्या दोन मालिकांत होणार मोठा बदल

नुकतीच एक सुखद बातमी हाती आली आहे!!..झी मराठी वाहिनी आता लवकरच आपल्या मनोरंजनाच्या बाबतीत मोठा बदल घडवून आणणार आहे. ही बातमी झी प्रेक्षकांना सुखद धक्का देणारी आहे असे म्हणायला हरकत नाही. त्याला कारणही तसेच आहे. तुझ्यात जीव रंगला ही मालिका नुकतीच निरोप घेणार असल्याचे समोर आले होते. परंतु असे काहीही घडणार नसल्याचे सांगितले जात आहे. ही मालिका रात्री साडेसात वाजता प्रक्षेपित होत होती. गेल्या काही दिवसांपूर्वी या मालिकेच्या जागी “लग्नाची वाईफ वेडिंगची बायको ” ही मालिका २१ ऑक्टोबर पासून प्रदर्शित होणार असे प्रोमोवरून पाहायला मिळत होते.

हे सत्य असले तरी आता “तुझ्यात जीव रंगला” ही मालिका बंद होणार नसल्याचे समोर आले आहे. केवळ मालिकांच्या वेळेत बदला करण्यात आल्यामुळे ही मालिका बंद पडण्याची चिन्ह दिसत होती. आदेश बांदेकर यांची “होम मिनिस्टर” ही मालिका संध्याकाळी ६ वाजता तर “तुझ्यात जीव रंगला” ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रक्षेपित होत आहे. त्यामुळे मसलिकेच्या चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणीच म्हणावी लागेल. मालिका बंद होतेय म्हटल्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती परंतु आता तसे काहीच नसल्याने हा केवळ ‘वेळेत केलेला बदल’ आहे. तेंव्हा राणा आणि अंजलीच्या चाहत्यांनी घाबरून जायचं कारण नाही अनुज काही दिवस हि मालिका आपलं मनोरंजन नक्कीच करेल यात शंका नाही.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *