zapatlela avdi

९० च्या दशकात मराठी चित्रपट सृष्टीत अभिनेत्याचं राज्य होतं मात्र अश्या काही अभिनेत्र्याही होत्या ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली. त्यातील अनेक अभिनेत्री आजही छोट्या पडद्यावर पाहायला मिळतात, चला तर मग अश्याच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात.. झपाटलेला, माझा छकुला, विदूषक, चिकट नवरा यासारख्या दमदार चित्रपटात अभिनेत्री पूजा पवार साळुंखे हिने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केले. लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांच्या ऑनस्क्रीन जोडीईतकीच पूजा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती.

pooja pawar marathi actress
pooja pawar marathi actress

लक्ष्मीकांत बेर्डे आणि पूजा पवार हि मराठी सिनेसृष्टीतील एक अजरामर जोडी मानली जाते. आजही हे चित्रपट छोट्या पडद्यावर तितकेच आपुलकीने आणि उत्साहाने पहिले जातात, हीच यांच्या अभिनयाची पावती. कोल्हापूर येथे जन्मलेल्या पूजा पवार यांनी वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी अभिनेते अजिंक्य देव सोबत “सर्जा” हा पदार्पणातील पहिलाच चित्रपट साकारला आणि चांगलाच यशस्वीदेखील ठरला. यातील त्यांच्या भूमिकेलाही गौरविण्यात आले. तिथून पुढे या क्षेत्रात त्यांनी आपला चांगलाच जम बसवला. टोपीवर टोपी, एक होता विदूषक, विश्वविनायक, धोंडी यासारखे दमदार चित्रपट त्यांनी साकारले. मध्यंतरी या क्षेत्रापासून थोड्याशा बाजूला झाल्या खऱ्या परंतु धोंडी चित्रपट साकारून पुन्हा या क्षेत्रात पदार्पण केले. झी युवा वरील “बापमाणुस ” मालिकेतील त्यांच्या भूमिकेलाही रसिकांकडून चांगलीच दाद मिळाली. सचिन पिळगावकर दिग्दर्शित “अशी ही आशिकी ” चित्रपटात सध्या त्या भूमिका साकारत आहेत.

puja pawar actress
puja pawar actress

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा म्हणजेच अभिनय बेर्डे चा हा दुसरा सिनेमा असल्याने प्रेक्षकांमध्येदेखील याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसावर जोरदार एन्ट्री केली पण चित्रपटाला हवं तेवढं यश मिळालं नाही, पण सध्या जोरदार चर्चा आहे ती पूजा पवार-साळुंखे यांच्या मुलीची म्हणजेच “अलिशा साळुंखे ” हिची. अलिशाने देखील आईच्या पाऊलावर पाऊल टाकत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. नुकतीच ती “Mia- तनिष्क” च्या जाहिरातीत झळकलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे अलिशा एक स्टार कीड म्हणून या क्षेत्रात आपला जम बसवणार का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वी अलिशाला नाटकांत काम करायची खूप इच्छा आहे. यापूर्वी अलिशा साळुंखे हिने मॉडेलिंग केलय. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत हळूहळू तीही याच क्षेत्रात यशस्वी होईल यात शंका नाही.अलिशाला तिच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खुप खुप शुभेच्छा!..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *