ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन…यांचं मराठीतील योगदान पाहून थक्क व्हाल

मराठी हिंदी नाटक चित्रपट अभिनेते किशोर प्रधान यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक रंगभूमीवरील नाटके आपल्या अभिनयाने गाजवली आहेत. येरे येरे पैसा, फ्रेंडशिप अनलिमिटेड F.U., ब्रेव्हहार्ट, भिंगरी, लालबाग परळ या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. नुकताच येऊन गेलेला “शुभ लग्न सावधान” चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारलेली पाहायला मिळाली. बऱ्याच दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावल्याने अनेक कलावंत त्यांची नेहमी विचारपूस करत.

अगदी शेवटपर्यंत त्यांनी या अभिनय क्षेत्रात दिलेले योगदान निश्चितच उल्लेखनीय म्हणावे लागेल. दूरदर्शन , टीव्हीवरील अनेक मालिका त्यांनी रंगवल्या आहेत. त्यांची पत्नी शोभा प्रधान यादेखील अभिनेत्री आहेत. दोघांनी एकत्रित गजरा ही मालिका गाजवली होती. हिंदी सिने क्षेत्रात देखील त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
पारिजात संस्थेतर्फे त्यांना “रंगसेवा” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. बँक ऑफ बरोडा, मॅक्स हेल्थ केअर च्या जाहिरात क्षेत्रात देखील ते झळकले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सिने सृष्टीतून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. “लगे रहो मुन्नाभाई” चित्रपटात त्यांनी खट्याळ आजोबांची भूमिका साकारली होती. ही भूमिका छोटी जरी असली तरी रसिकांच्या मनात आपल्या अभिनयाची छाप पाडली होती.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *