ज्या रवींद्र नाट्यगृहात ‘तुला काहीच येत नाही ‘ अशा शब्दात हिणवले, त्याच नाट्यगृहात झी वाहिनीने ‘ विशेष पुरस्काराने ‘ सन्मानित

“कृष्णा घोंगे” हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुडे गावचे राहणारे. हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातुन शिक्षण घेऊन मुंबईत दिग्दर्शक आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. याच क्षेत्रात करियर घडवून आणायचे असे मनाशी ठरवले. त्यासाठी या क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या भेटी घेतल्या . काम मिळावे म्हणून रवींद्र नाट्यगृह, प्रभादेवी याठिकाणी एका दिग्दर्शकाची भेट घेतली.बोलण्यात गावठी भाषेचा बाज असल्याने त्याला सरळ नकार देत…’तुला काहीच येत नाही तुला नाही जमणार ‘ अशा शब्दात सुनावले.

हा नकार पचवणे थोडेसे जड वाटू लागले परंतु काहीही झाले तरी परत जायचे नाही हा अट्टाहास. या जिद्दीमुळेच हिंदी वाहिनीवरील पडद्यामागची मिळेल ती छोटी मोठी कामे त्याने पत्करली. सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल, फिअर फाईल्स सारख्या प्रसिद्ध मालिकेत छोट्याछोट्या भूमिका आणि सहाय्यकाची कामे मिळू लागली. अकबर बिरबल बिग मॅजिक, साथ निभाना साथीय, जाण बाज जिंदाबाद, जमाई राजा या मालिकेचा यो एक भाग बनला.
यातून पुढे वेबसिरीज आणि शॉर्टफिल्मची निर्मिती करण्याचे ठरवले. “डिसीजन”, “संज्या” , “द प्रोव्हाईडर ” यासारख्या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन करून प्रसिद्धी मिळवली.
झी मराठीवरील ” चला हवा येऊ द्या “मध्ये सुरुवातीला मिळेल ती कामे केली. मग हळूहळू अभिनय क्षेत्रात यशस्वीरीत्या पाऊल टाकले. या रंगमंचावर त्याने बहुतेकवेळा आपली कला सादर केली. याच कलेची पावती देत झी मराठीने २०१८ च्या पुरस्कारावेळी त्याला “विशेष पुरस्काराने” गौरविण्यात आले. हा तोच मंच होता जिथे त्याला सुरुवातीला एका दिग्दर्शकाने नकार दिला होता. त्याच रंगमंचावर त्याला या पुरस्काने गौरविले याचा त्याला सार्थ अभिमान वाटावा असाच तो क्षण त्याने अनुभवला होता.
.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *