जे आजवर कोणालाही शक्य झालं नाही ते पुण्यातील माजी खासदारांने करून दाखवलं

पुण्यातील माजी खासदार अनिल शिरोळे सध्या चांगलेच चर्चेत येऊ लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वछ भारत अभिनयाला अनुसरून पुण्यातील सार्वजनिक ठिकाणी ‘ई टॉयलेटची’ आधुनिक संकल्पना त्यांनी विकसित केली आहे. त्यांच्या खासदार निधीतून पुणे शहरातील प्रभाग क्रमांक १४ या ठिकाणी तब्बल ५ ई टॉयलेट उभारण्यात आली आहेत. ही सर्व सिस्टीम ऑटोमॅटिक असल्याचे सांगितले जाते. कुठलाही एक कॉइन टाकून या टॉयलेटचे दार उघडले जाते. कॉइन टाकण्यामागे मुळात हाच हेतू आहे की ह्या सुविधेचा वापर नेमका किती लोकांनी केला आहे ते समजते . संपूर्णपणे ऑटोमॅटिक असलेल्या या ई टॉयलेटमध्ये फ्लश सिस्टीम देखील ऑटोमॅटिकच आहे. शिवाय प्रत्येक वापरानंतर टॉयलेटचा तळ देखील धुतला जातो. यामुळे अंतर्गत स्वच्छता ही आपोआपच राखली जाते.

स्वच्छता आणि नादुरुस्तीचे कॉन्ट्रॅक्ट एका खाजगी कंपनीकडे सोपवण्यात आली आहेत. जेणेकरून कुठलीही गैरसोय होणार नाही. गेल्या वर्षी या प्रभागाने स्वछ सर्वेक्षण अंतर्गत पुण्यात पहिला क्रमांक पटकावला होता. याच हेतूने त्यांनी ही आधुनिक सुविधा देण्याचे कार्य हाती घेतले आहे. या उपक्रमाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शिवाय भविष्यात असे उपक्रम अन्य भागात देखील राबवावेत अशी आशा नागरिकांनी बाळगली आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *