जेव्हा महेंद्रसिंग धोनी जॉन इब्राहिमच्या घरी गेटला कुलूप असताना असा गेला होता …बर्थडे स्पेशल धमाल किस्सा

महेंद्रसिंग धोनी आणि त्याचे बाईक प्रेम आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्याच्या कलेक्शन मध्ये अनेक ब्रँडेड बाईक्सचा तसेच ब्रँडेड कार्सचा संच आहे. धोनीच्या कलेक्शनमध्ये एक करोड किंमतीची रॉयल बाईक हमर चा समावेश आहे. याशिवाय त्याच्याकडे ऑडी क्यू 7, लँड रोव्हर, फरारी सहित अनेक मॉडीफाय केलेल्या स्कॉर्पिओ गाड्या आहेत. अनेकदा तो रस्त्यावर उतरून बाईक्स रायडिंगचा आनंद लुटताना दिसतो. त्याचे हे बाईक प्रेम एकदा बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहिमच्या घरापर्यत गेले होते. झाले असे की, जॉनने एक नवी बाईक खरेदी केली होती. तीला पाहण्यासाठी धोनी खूप उत्सुक होता.

जॉन आणि धोनी दोघेही त्याच्या घरी गेले पण तिथे गेल्यावर जॉनच्या घरच्या गेटला लॉक होते. सुट्टी असल्याने तिथला सिक्युरिटी गार्ड त्यावेळी तेथे उपस्थित नव्हता. मग त्या दहा ते बारा फूट उंचीच्या गेटवर चढून आत प्रवेश करायचा असे त्यांनी ठरवले. जॉन एक एक टप्पा चढत गेटच्या वरपर्यंत पोहोचला. मात्र धोनी रस्त्याच्या दुसऱ्या कडेला जाऊन धावत येऊन त्या गेटवर अगदी एकाच ढांगेत वर चढला. एका सजग खेळाडूची झलक त्यावेळी जॉनने अनुभवली होती. बाईक पाहून झाल्यावर पुन्हा त्यांनी गेटवर चढून बाहेर यायचे ठरवले. धोनी पाहिल्यासारखाच सरसर चढाई करून जॉनची वाट पाहू लागला. इकडे मात्र जॉन वर चढल्यावर गेटच्या सळ्यामध्ये अडकून बसला. रस्त्याने जाणारे येणारे लोक धोनीला रस्त्यावर आणि जॉनला गेटवर पाहून हबकले. जॉन खाली येण्याचा प्रयत्न करत होता पण पुढे येताच अडकलेली पॅन्ट त्याला पुन्हा मागे खेचत होती. हे पाहून धोनी अक्षरशः लोटपोट होऊन हसत होता. अखेर दोन ते तीन मिनिटानंतर जॉन गेटच्या तावडीतून निसटला आणि खाली आला. ही धम्माल धोनीने स्वतः एका मुलाखतीत शेअर केली होती.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *