jumanji actor list

९० च्या दशकातील “जुमांजी” हा अमेरिकन चित्रपट खूपच लोकप्रिय झाला होता. एक किड्स मुव्ही म्हणून या चित्रपटाला ओळख मिळाली असली तरी तरुणांमध्येही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळाली होती आणि आजही हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहिलाही जातो हे विशेष. एका मॅजिकल बोर्ड गेम भोवती गुरफटलेल्या घटनांमधून सर्वांची सुटका कशी होते असे हे थरारक पण विनोदी वलय असलेले हे कथानक चित्रपटाच्या माध्यमातून सुरेखपणे दर्शविण्यात आले होते. दरवेळी नवीन काहीतरी घडणार असल्याने चित्रपट पाहताना अजिबात कंटाळा येत नाही हे विशेष. आज चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास २५ वर्षे होत आहेत त्यातील कलाकार आता कसे दिसतात हे आजच्या लेखातून जाणून घेऊयात…

jumanji little actress now
jumanji little actress now

१. क्रिस्टन डंस्ट( बालकलाकार)- क्रिस्टन डंस्ट हिने जुमांजी या चित्रपटात जुडी शेफर्ड या लहान मुलीची भूमिका बजावली होती. याच मुलीला मॅजिकल गेमचा बोर्ड सापडल्याचे दाखवण्यात आले होते. अजानतेपणाने तिच्याकडूनच हा खेळ पहिल्यांदा खेळला गेल्याचे दर्शवले होते. या चित्रपटा अगोदर क्रिस्टन डंस्ट ही एक बालकलाकार म्हणून काही चित्रपटात झळकली होती. पुढे स्मॉल सोल्जर, ब्रिन्गीट ऑन यासारख्या चित्रपटासोबतच ‘स्पायडरमॅन’ या गाजलेल्या चित्रपटातही ती झळकली. जेसी प्लिमोंस या आपल्या कोस्टार सोबत एंगेज्ड झाल्यावर एका मुलाची ती आईदेखील बनली.

bradly pierce actor
bradly pierce actor

२. ब्रॅडली पिअर्स (बालकलाकार)- जुडी शेफर्डच्या छोट्या भावाची अर्थात पीटर शेफर्डची भूमिका ब्रॅडली पिअर्स या बालकलाकाराने साकारली होती. जुमांजी चित्रपटाच्या यशानंतर ब्रॅडली अनेक टीव्ही मालिका, चित्रपट आणि व्हिडीओ गेम्सच्या माध्यमातून एक व्हॉइसओव्हर ऍक्टर म्हणून नावारूपास आला आहे. ९० च्या दशकातील ‘सॉनिक हेजहॉग’ या कार्टूनसीरिजमध्ये त्याचा आवाज ऐकायला मिळाला. अभिनय आणि निर्मिती क्षेत्राव्यतिरिक्त तो ‘Pierce & Luna’ (कॉकटेल)चा सह संस्थापक आहे.

robin williams actor
robin williams actor

३. रॉबिन विल्यम्स- चित्रपटात रॉबिन विल्यम्स यांनी अलन पॅरिशची भूमिका साकारली होती जो या दोन्ही मुलांना येणाऱ्या संकटातून वाचवताना दिसला. जुमांजी चित्रपटानंतर अनेक हिट चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवून दिली होती हॉलिवूड आयकॉन अशीही ओळख त्यांनी मिळवली होती. चित्रपटातील त्यांच्या विनोदी भूमिकांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत असे परंतु ऑगस्ट २०१४ साली वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली होती. या घटनेने चाहत्यांसह हॉलिवूडला खूपच मोठा धक्का बसला होता. एवढे मोठे यश मिळूनही त्यांनी असे का केले म्हणून जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

bonnie hunt jumanji
bonnie hunt jumanji

४. बोनी हंट- सारा व्हीटल ही भूमिका बोनी हंट यांनी साकारली होती. अलनवर प्रेम करणारी ही त्याची मैत्रीण चित्रपटातून खूपच सुंदर आणि विनोदी दर्शवली होती. बोनी हंट या अमेरिकन अभिनेत्री, विनोदी कलाकार,दिग्दर्शिका, निर्मात्या, लेखिका, होस्ट अशा वेगवेगळ्या भूमिका बजावताना दिसतात. त्यांच्याच नावाने असलेला ‘ बोनी हंट शो’ खूपच लोकप्रिय असलेला पाहायला मिळतो. १९८८ साली इन्व्हेस्टमेंट बँकर असलेल्या जॉन मर्फी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. परंतु २००६ साली मात्र एकाकी जीवन जगावे म्हणून त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर बोनी हंट या शिकागो येथील नॉर्थवेस्टर्न मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून सेवा देत होत्या.

bebe neuwirth actress
bebe neuwirth actress

५. बेबे न्यूवर्थ- आई वडिलांच्या पश्चात दोन्ही मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांचे नातेवाईक म्हणजेच जोरा शेफर्ड हिच्याकडे होती. ही भूमिका बेबे न्यूवर्थ यांनी निभावली होती. ९० च्या दशकाच्या सुरुवातीलाच आपल्या सजग अभिनयातून तब्बल दोन एम्मी अवॉर्ड तिने जिंकले होते. चित्रपट, नाटक हा अभिनयाचा तिचा प्रवास आजही सुरू असून २००९ साली एका प्रतिथयश दिग्दर्शकासोबत तिने लग्नही केले आहे.

jonathan hyde actor
jonathan hyde actor

६. जोंथॉन ‘नॅश’ हाईड- जुमांजी चित्रपटात जोंथॉन यांनी दोन भूमिका बजावल्या होत्या. अलन पॅरिशच्या वडिलांची आणि दुसरी म्हणजे गेमच्या माध्यमातून आलेल्या शिकाऱ्याची. अलनला मारण्यासाठी तो किती उपद्व्याप करतो हे चित्रपटातून दर्शविण्यात आले होते. ‘टायटॅनिक’ या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी एका बिजनेसमन ची भूमिका देखील साकारली होती. त्यांनी अभिनित केलेली ‘द स्ट्रेन’ (२०१४ ते २०१७ ) ही सिरीजही खूप गाजली होती. ‘जॉर्जिया किंग’ ही त्यांची मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. व्हाईस प्रिन्सिपल्स हा चित्रपट तिने अभिनित केला आहे.

david alan grier
david alan grier

७. डेव्हिड ग्रेयर- बुटाच्या कारखान्यातील सॅमच्या बालपणीच्या मित्राची भूमिका डेव्हिड ग्रेयर यांनी साकारली होती. पुढे जाऊन हाच मुलगा पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळाला. डेव्हिड ग्रेयर हे एक उत्कृष्ट विनोदी अभिनेते म्हणूनही ओळखले जातात. त्याची झलक जुमांजी चित्रपटातून पाहायला मिळाली होती. आजही टीव्ही मालिका, नाटक आणि चित्रपटाच्या माध्यमातून ते नेहमीच प्रेक्षकांसमोर येत राहतात.

adam hann byrd
adam hann byrd

८. ऍडम ह्यान बीर्ड- ऍडमने जुमांजी चित्रपटात बालपणीच्या अॅलन पॅरिशची भूमिका साकारली होती. जो मोठेपणी या दोन्ही मुलांना संकटातून वाचवण्यास मदत करत असतो. ऍडम हा आजच्या घडीला एक अमेरिकन अभिनेता म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे तो एक स्क्रीनरायटर म्हणूनही या क्षेत्रात परिचित आहे. जुमांजी चित्रपटावेळी त्याचे वय १३ वर्ष होते. त्यानंतर टीव्ही मालिकांमध्ये रायटर म्हणून काम करत असताना कॅमेऱ्यामागे राहून त्याने आपली भूमिका बजावली होती. प्रमुख नायक म्हणूनही काही चित्रपट त्याने अभिनित केले आहेत.

laura bell bundy
laura bell bundy

९.लौरा बेल बंडी- लौरा बेल बंडी हिने बालपणीची सारा व्हीटलची भूमिका साकारली होती. आजच्या घडीला ती एक अमेरिकन अभिनेत्री तसेच गायिका म्हणूनही ओळखली जाते. अनेक म्युजिक अल्बम तीने गायले असून त्याला चाहत्यांकडून उस्फूर्तपणे प्रतिसाद देखील मीळतो आहे. २०१५ साली TBS या अमेरिकन टीव्ही चॅनलच्या एक्झिक्युटिव्ह असलेल्या टॉम हिंकल सोबत तिने लग्न केले. मार्च २०२० रोजी तिची कोरोना पॉजिटिव्ह असल्याची बातमी वेगाने पसरली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *