‘जागो मोहन प्यारे’ मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार

जागो मोहन प्यारे हि झी वाहिनीवरील मालिका सध्या चांगलीच गाजतेय. सध्याभोळ्या मोहनच्या आयुष्यात त्याला त्रास देणारे त्याच्या घरातील त्याची पत्नी, सासू तसेच चाळीतील लोक आणि मग त्याची साथ देणारी परी ‘भानुमती’ यांच्या चांगल्या जुळणीमुळे मालिका पाहायला गम्मत येते. मालिका सुरूहोऊन जवळपास वर्ष होत आलं पण मालिकेतील पात्रे ज्याप्रकारे मालिकेत धम्मल घडून आणतात त्यामुळे मालिका पाहायला तितकाच उत्साह येतो.

विद्याधर पाठारे आणि मानिशा दळवी हे या मालिकेचे प्रोड्युसर असून ओंकार डिंगोरे हे मालिकेचं डायरेक्टर तसेच लिखाण केले आहे. मालिकेतील पत्रे तर सर्वांची ओळखीची आहेतच पण त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घेऊयात.

अतुल परचुरे –

अतुल परचुरे यांचा जन्म नोव्हेंबर ३०, (वर्ष माहीत नाही) हा मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील अभिनेता आहे. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांमधूनही त्याने भूमिका केल्या आहेत तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे. प्रख्यात नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे ह्या अतुल परचुरे यांच्या पत्‍नी आहेत. दोघांची ओळख नाटकात काम करताना झाली. ’गेला माधव कुणीकडे’ आणि ’तुझे आहे तुजपाशी’ या नाटकांत दोघेही काम करत होते. अतुल परचुरे याना सखील परचुरे नावाची मुलगी आहे. सध्या ते तिघेही मुंबई स्थायिक आहेत.

२. श्रुती मराठे –

श्रुती मराठे हीच जन्म ९ ऑक्टोबर १९८५ साली संभाजीनगर, चिंचवड, पुणे येथे झाला. पुरुषोत्तम आणि स्मिता मराठे यांची हि कन्या. श्रुतीला एक मोठी बहीण आहे त्यांचं नाव प्रीती मराठे – तोमर. सध्या त्या ऑस्ट्रेलियात स्थायिक आहेत. श्रुतीच बालपण पुण्यातच गेलं. पुण्याच्या सेन्ट मीरा गर्ल्स कॉलेज पुणे येथून शिक्षण घेतलं. शिक्षणानंतर त्या मॉडेलिंग कडे वळल्या लहानपानापासूनच श्रुतीला अभिनयाची आवड होती पण काही केल्या त्यांना मराठी सिनेश्रुष्टीत काम मिळेना म्हणून त्या कॉलीवूड (तमिळ सिनेमा) कडे वळल्या. २०१३ साली “तुझी माझी लव्ह स्टोरी” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान श्रुतीला गौरव घाणेकर यांच्याशी प्रेम जुळलं आणि ६ डिसेंबर २०१६ रोजी त्यांनी लग्न केलं. सध्या दोघेही मुंबईत स्थायिक आहेत.

३. सुप्रिया पाठारे –

सुप्रिया पाठारे यांचा जन्म सँधर्स्ट रोड, मुंबई येथे उमरखेडी येथे झाला. तिच्या कुटुंबात अभिनय करण्याची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. शालेय दिवसापासून ते थिएटरमध्ये अतिशय सक्रिय होती आणि 7 व्या स्टँडर्डमध्ये असताना एक स्क्रिप्ट लिहीली. तीन पैशाचा तमाशा हे एक नाटक आहे जेथे अनेक हौशी कलाकार आपल्या नशीबवर लक्ष ठेवतात आणि सुप्रिया यांनी आपल्या गुरू वमन केंद्रेच्या मदतीने आपल्या अभिनय कौशल्याची छबी मंडली. मराठी नाटक डार्लिंग, डार्लिंगसह करिअरची सुरुवात केली. डार्लिंग, डार्लिंग सुप्रिया यांचे पहिले व्यावसायिक नाटक होते. सोळाव्या वर्षांत सुप्रिया यांनी अनेक नाटकांचे प्रदर्शन केले आणि अभिनय क्षेत्रातील मान्यवरांमध्ये एक ठसा उमटविला.
सुप्रिया यांनी कॉमेडी रिअलिटी शो फु बाई फूच्या अभिनयाने कॉमेडियन म्हणून आपली प्रतिभा दाखवली आहे. तिने एक वर्ष मध्ये भाऊ कदम यांनी जिंकलेल्या फू बाई फूमध्ये विविध भूमिका प्रकार, नकारात्मक वर्ण, प्रेमळ मातृभाषा आणि कॉमेडी स्टँडअप अभिनेता म्हणून भूमिका बजावल्या.

४ . मीरा पाठारकर –

मीरा पाठारकर यांनी केलेलं काप सॉंग नुकताच खूप गाजलय. तिने मराठी रंगभूमीवर अनेक नाटके केली. झी वाहिनीवरील चूक भूल द्यावी घ्यावी ह्या मालिकेतही तिची भूमिका पाहायला मिळाली.

५. संदीप जुवतकर –

संदीप जुवतकर यांच्या चांगल्या शरीरयष्टीमुळे बऱ्याच चित्रपटात त्यांना पोलिसांची भूमिका मिळाली. जागो मोहन प्यारे हि त्यांची झी मराठीवरील पहिली मालिका आहे.
मालिकेतील आणखीन कलाकारांची माहिती फोटोसह आम्ही तुम्हाला पुढच्या आर्टिकल मध्ये देऊ.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *