“जय मल्हार” मालिकेतील ह्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा नुकताच झाला साखरपुडा… फ़ोटो पाहण्यासाठी

” जय मल्हार ” या झी वाहिनीच्या गाजलेल्या मालिकेत अभिनेत्री सुरभी हांडे ने “म्हाळसा ” साकारली होती.तिची ही पाहिलीवाहिली मालिकेतील भूमिका प्रेक्षकांनीही खूप आवडली होती. या मालिकेनंतर तिने “अगबाई अरेच्चा 2” या चित्रपटात काम केले होते. साधी सरळ भूमिका करणारी सुरभी आपल्या साडीच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसते, त्यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशिअल मीडियावर तिचे फोटो चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळतात. तिच्या पहिल्याच मालिकेत ती लोकप्रिय झाली.

नुकतेच सुरभी हांडेचा साखरपुडा दुर्गेश कुलकर्णी सोबत झाला असून तिच्या चाहत्यांना तिने सुखद धक्काच दिला आहे. तिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका इंटरव्हिव मध्ये ती लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचेही तिने सांगितले होते. सुरभी ही मूळची जळगावची आहे तर तिचा होणार नवरा दुर्गेश कुलकर्णी हा देखील जळगावचाच आहे. २०१७ सालापासून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचे तिने स्पष्ट केले होते. दुर्गेश कुलकर्णी पॉवर बाईट्स मध्ये कार्यरत असून पुण्याला स्थायिक असल्याचे बोलले जाते.
सुरभीच्या नुकत्याच झालेल्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. सुरभी यापुढेही मालिका करणार असल्याचे तिने बोलले आहे, सुरभीला तिच्या भावी आयुष्यासाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा!…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *