जया प्रदा ह्यांच्या सोबत हिंदी मालिकेत चक्क हि मराठमोळी अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत…

आजवर मराठीतील अनेक अभिनेत्री तसेच अभिनेत्याने हिंदी मालिकेत काम केले आहे. या यादीत आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा समावेश होताना दिसत आहे. “काहे दिया परदेस” या झी मराठीवरील मालिकेत “गौरीची” भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजेच सायली संजीव चक्क आता हिंदी मालिका साकारताना पाहायला मिळणार आहे. “काहे दिया..” मध्ये सायलीने अतिशय उत्तम भूमिका साकारली होती. या नवख्या चेहऱ्याला प्रेक्षकांनीही आपलेसे केले होते.

३१ जानेवारी१९९३ साली सायलीचा जन्म झाला. ती मूळची धुळे जिल्ह्यातील जरी असली तरी संपूर्ण शिक्षण मात्र तिने नाशिक मधूनच पूर्ण केले आहे. आटपाडी नाईट्स ,पोलीस लाईन या चित्रपटाखेरीज गुलमोहर ही मालिकाही तिने साकारली आहे. यासोबतच अंबारी मसाले, कोलगेट सारख्या काही व्यावसायिक जाहिरातींमध्ये देखील ती झळकली आहे.
आता सायली &tv वरील ” परफेक्ट पती ” ही हिंदी मालिका साकारत आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा यादेखील या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. येत्या ३ सप्टेंबर रोजी ही मालिका आपल्याला पहायला मिळणार आहे. मालिकेत सायलीने “विधिता राजावतची” प्रमुख भूमिका साकारली आहे. तर आयुष आनंद हा तिचा सहकलाकार म्हणून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सायली आणि जयाप्रदा यांची सासू सुनेची जोडी ऑनस्क्रीन कशी दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकामध्ये निर्माण झाली आहे.
सायली संजीवला तिच्या या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा!!!…

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *