छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्यातील नाणी ‘शिवराई’ व ‘सुवर्ण होन’ बद्दल जाणून घ्या

‘शिवराई’ व ‘सुवर्ण होन’ बद्दल जाणून घेऊयात. शिवराई हे शिवाजीमहाराजांनी राज्याभिषेकाच्यावेळी पाडलेले नाणे आहे. सन १९२० पर्यंत हे नाणे चलनात होते. ब्रिटिश राजवटीत नवीन नाणी आल्यानंतर ते हळूहळू बंद झाले. ब्रिटिशांनी सर्व शिवराया गोळा करायचा प्रयत्न केला, पण अजूनही काही किल्यांजवळील नदीतील वाळूत किंवा जमिनीत सापडतात.

होन हे एक शिवकालीन चलन होते. ते सोन्यापासून बनवले गेले होते. होन वजन सुमारे २.७ ते २.९ ग्राम असायचे. होन शिवाजी महाराजांनी राज्य अभिषेकाच्या वेळी प्रसिद्ध केले होते. उपलब्ध माहितीनुसार अशी सात लक्ष ‘सुवर्ण होन’ जारी केली होती.

वस्तू विनिमय द्वारे धनाची देवाणघेवाण करताना येणाऱ्या अडचणींमुळे नाणी हे चलन वापरात आले. पूर्वी कवड्या, शंख, मणी अश्या अनेक गोष्टी पैसा म्हणून वापरल्या जायच्या. धातूंच्या शोधानंतर धातूंच्या चकत्या बनवून त्यावर तत्कालीन राजाचे चिन्ह कोरणे किंवा छापणे त्याचा वापर व्यापारासाठी नाण्याच्या रुपात होऊ लागला.

नाण्यांतून तत्कालीन संस्कृतीची ओळख मिळू शकते. त्या त्या वेळी समाजात महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी, प्रभावी व्यक्ती, महत्वपूर्ण घटना नाण्यांवर कोरल्या जातात. यामुळे नाणी ही इतिहासाचा अभ्यास करण्या साठी महत्वाची ठरतात.

दुर्मिळ नाण्यांचा संग्रह करून नाण्यांच्या सर्वसमावेशक अभ्यास करणाऱ्या शास्त्राला नाणकशास्त्र (Numismatists) म्हणतात. प्राप्त झालेल्या नाण्यांचा अभ्यास करित असताना ऐतिहासिक शक्यतांची पडताळणी केली जाते आणि मग निष्कर्ष काढले जातात. नाण्यांच्या प्रदर्शनातून संबंधित कालखंडाची वैशिष्ट्ये सांगता येतात व आजच्या कालखंडाशी त्या त्या काळातील नाण्यांच्या आधारे तुलनात्मक विवेचन करता येते.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *