चित्रपटासाठी जमीन आणि गाडी विकली .. सर्वांचा लाडका राहुल्या आता झळकणार मोठ्या पडद्यावर

छोट्या पडद्यावरील लागींर झालं जी ही मालिका गाजवून सर्वांचा लाडका राहुल्या म्हणजेच राहुल मगदूम हा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत याच मालिकेतील अगोदरची जयडी म्हणजेच किरण ढाणे पाहायला मिळणार आहे. ‘भागी’ नावाच्या या धावपटूचा जीवनप्रवास चित्रपटाच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे. “पळशीची पिटी” हा चित्रपट येत्या २३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.गेल्या वर्षी कांस फेस्टिव्हल मध्ये या चित्रपटाची निवड केली गेली होती. खरं तर हा चित्रपट गेल्याच वर्षी प्रदर्शित होणार होता परंतु काही अडचणींमुळे हा चित्रपट येत्या २३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित केला जात आहे.

तुम्हाला लागींर झालं जी मालिकेतील शितलचे आप्पा आठवतात का? जे काही कारणास्तव मालिकेतून अचानक गायब झाले होते …हेच आप्पा म्हणजेच धोंडिबा कारंडे या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती करण्यात व्यस्त होते, याचमुळे त्यांनी मालिकेतून काढता पाय घेतला होता. खरं तर पळशीची पिटी चित्रपट साकारण्यासाठी त्यांनी आपली जमीन आणि गाडी देखील विकली आहे. अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी कांस चित्रपट महोत्सवापर्यंत मजल मारली आहे. या चित्रपटात साताऱ्यातील बऱ्याच कलाकारांना संधी दिली आहे ज्यात लागींर झालं जी या झी वाहिनीच्या मालिकेतील बरेचसे कलाकार झळकणार आहेत. छोट्या पडदयावरील राहुल आणि जयडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *