चित्रपटांसाठी नोकरी सोडली, पण सासऱ्यांनी नोकरी सोडायला केला विरोध.. पहा ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांच्याबद्दल

ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांच्याबद्दल बोलायचं तितकं कमीच. रंगभूमी असो किंवा मराठी, हिंदी चित्रपट तसेच मालिकेत , आजतागायत या अभिनेत्याने आपल्या अभिनयाचा पाया घट्ट रोवला आहे. धमाल बाबल्या गणप्याची, इजा बिजा तिजा या चित्रपटातील भूमिकेपासून ते थेट “जाडू बाई जोरात ” मालिकेपर्यंतचा त्यांचा प्रवास कलात्मक झाला आहे. ३ मे १९३६ साली त्यांचा जन्म झाला.त्यांचे शिक्षण मुंबईतच झाले. पत्नीचे नाव उषा पेंडसे. प्रसिद्ध नाट्यकर्मी मामा पेंडसे म्हणजेच चिंतामणी पेंडसे यांच्या त्या कन्या होय. सुरुवातीला नाटकाला वेळ मिळावा म्हणून जयंत सावरकर यांनी नोकरी सोडली ,परंतु सासऱ्यांचा नोकरी सोडण्याला विरोध असल्याने पुन्हा नोकरी करत असताना पडद्यामागची कामे त्यांनी स्वीकारली. आजही नाटक आणि चित्रपटांत काम करणे आणि त्यातून पैसे मिळवणे खूप कठीण गोष्ठ आहे, त्यावेळीही हातात काहीतरी फिक्स इनकम असावा असं प्रत्येकाचं मत आणि काळाची गरज होती.

“किंग लिअर” या नाटकात त्यांना अभिनयाची संधी मिळाली. त्यांची ही ” विदूषक ” ची भूमिका चांगलीच गाजली. एकच प्यालातील तळीराम, पु लं च्या व्यक्ती आणि वल्ली मधील अंतू बर्वा आणि हरितात्या त्यांनी सुरेख साकारला. वास्तव, सिंघम, कुरुक्षेत्र सारख्या बॉलिवूड चित्रपटातही ते झळकले. मराठी नाट्यपरिषदे कडून त्यांना जीवन गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलय.
जयंत आणि उषा सावरकर यांना कौस्तुभ सावरकर , सुषमा सावरकर- जोग आणि सुपर्णा नकाशे ही मुले आहेत. सुषमा सावरकर – जोग यांनी “चूक भूल द्यावी…” या झी मराठीवरील मालिकेत मालूची आई साकारली होती. तर मुलगा कौस्तुभ यांचे लग्न अभिनेत्री शुभांगी भुजबळ यांच्यासोबत झाले आहे. शुभांगी भुजबळ यांनी झी युवा वाहिनीवरील गुलमोहर च्या “आई “या कथा मालिकेत तसेच झी मराठीच्या “गाव गाता गजाली ” मध्येही भूमिका साकारली आहे. “जुगाड” या नाटकाचाही त्या एक भाग बनल्या आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *