झी मराठीवर सर्वात जास्त लोकप्रिय असलेला मराठी कॉमेडी शो चला हवा येऊ द्या लवकरच परत येतोय. नुकताच झी मराठीने तसं अनाऊन्स केलय. विशेष म्हणजे हा चला हवा येऊ द्या चा जगभर दौरा असणार आहे ह्यात कलाकारांनी जगभर फिरून तेथील मराठी रसिकांसाठी लाईव्ह शो हि केलेत. जापान, फ्रान्स, इटली अमेरिका, यूरोप अश्या कित्येक देशांत जाऊन त्यांनी मराठी रसिकांचे मनोरंजन केले. वीणा वर्ल्ड ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक असून त्यांनीच हा शो जगभर घडवून आणलय. चला तर यातील कलाकारांच्या आयुष्यातील त्यांचे काही किस्से आणि लाईफ स्टोरी जाणून घेऊयात

भालचंद्र कदम


भालचंद्र पांडुरंग कदम यांचा जन्म १२ जून १९७२ साली झाला. हे भाऊ कदम म्हणून लोकप्रिय, मराठी चित्रपट अभिनेते आणि प्रसिद्ध विनोदवीर आहेत. विशेषतः कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत असतात. इ.स. १९९१ मध्ये त्यांनी नाटकात काम केले व येथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात झाली. फू बाई फूच्या भूमिकांबद्दल ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी ५०० ​​हून अधिक नाटक प्रयोगांमध्ये त्यांचा सहभाग आहे.

भाऊ कदम याचे बालपण मुंबईतील वडाळा परिसरातील बीपीटी क्वॉटर्समध्ये गेले आहे. वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालयातून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. बालपणापासूनच ते लाजाळू आणि शांत स्वभावाचे आहेत. वडिलांच्या अकाली निधनानंतर वडाळ्याहून ते आपल्या कुटुंबासोबत डोंबिवलीत स्थायिक झाले. भाऊ, घर खर्चासाठी मतदार नावे नोंदणीचे काम करत होते, पण त्यात भागत नसल्याने त्यांनी भावाच्या साथीने पानाची टपरी सुरू केली.

पंधरा वर्षांत भाऊ यांनी जवळजवळ ५०० नाटकांमध्ये अभिनय केला. खरं तर करिअरमध्ये मोठी संधी मिळत नसल्याचे पाहून त्यांनी अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला होता. मात्र त्याचकाळात विजय निकम यांनी त्यांना ‘जाऊ तिथे खाऊ’ या नाटकात मुख्य भूमिका दिली. हे नाटक त्यांच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरले.

भाऊ नाटकांमध्ये काम करत असल्याने त्यांच्याबद्दल इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांना माहित होते. त्यांच्यापैकी काहींनी त्यांचे नाव ‘फू बाई फू’साठी सुचवले. मात्र सलग दोनदा भाऊंनी ‘फू बाई फू’ची ऑफर नाकारली. लाजाळू स्वभावाच्या भाऊंना मला हे काम जमणार नाही, असे वाटायचे. मात्र तिसऱ्यांदा आलेली ऑफर त्यांनी स्वीकारली आणि संधीचे सोने केले. ‘फू बाई फू’च्या सहाव्या पर्वाचे ते विजेतेसुद्धा ठरले. भालचंद्र कदमांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात टाईमपास २, टाईमपास, सांगतो ऐका, मिस मॅच, पुणे विरूद्ध बिहार, नारबाची वाडी, कोकणस्थ, चांदी, मस्त चाललंय आमचं, बाळकडू असे काही यशस्वी चित्रपटही आहेत ज्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांनी एका हिंदी चित्रपट “फरारी की सवारी” मध्ये देखील अभिनय केला आहे.

भारत गणेशपुरे

जन्म १५ ऑगस्ट १९६९ दर्यापूर, अमरावती. विनोदी अभिनेता म्हणून लोकप्रियता मिळवणारा अभिनेता विदर्भातील कलावंत भारत गणेशपुरे. ज्यांचं नुसतं नाव उच्यारल्याने चेहऱ्यावर हसू येत.

शालेय शिक्षण घेतल्यानंतर श्री शिवाजी कॉलेज ऑफ ऍग्रीकलचर कॉलेज मधून पदवी घेतली. त्यानंतर एम. पी. एस. सी. ची परीक्षा द्यायला मुंबईत आले, तेथे एस. एन. डी. टी. कॉलेजच्या आवारात एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरु होत, अभिनयाची आवड असल्याने त्यांनी तेथील लोकांना विनंती करून चित्रपटात छोटासा रोल मिळवला. पुढे जी कामे मिळतील ती तो करत गेला. वऱ्हाडी भाषेवरची त्याची पकड पाहून त्याला “तंबू मे बंबु” ह्या हास्य चित्रपटात काम करायची संधी मिळाली, आणि तेथून तो विनोदी भूमिका करायला लागला.

अनेक हिंदी मराठी चित्रपट आणि मालिकांसाठी त्याने कामे केली. “मजाक मजाक में” “मिसेस तेंडुलकर” ह्या त्याच्या न विसरता येणाऱ्या मालिका. पुढे मराठी चित्रपट सातच्या आत घरात, चेकमेट, धोबीपछाड, पोस्टर बॉइस, फक्त लढा म्हणा, कापूस कोंड्याची गोष्ट अशे अनेक चित्रपट केले. पुढे त्याने “फु बाई फु” या कार्यक्रमात भाग घेतला. विनोदाचं परफेक्ट टाईमिंग आणि सागर कारंडेची साथ यामुळे तो महाराष्ट्राच्या घर घरात प्रसिद्ध झाला. सध्या तो चला हवा येउद्या मध्ये कुकरच्या वाडीतले सरपंच हि भूमिका चोख निभावतोय. सध्या तो पत्नी आणि मुलगा यांच्या समवेत मुंबईत स्थायिक आहे.

डॉ. निलेश साबळे
nilesh sable

डॉ. निलेश साबळे यांचा जन्म ३० जून, १९८६ साली झाला. डॉ. निलेश साबळे हे एक मराठी दूरदर्शन शो होस्ट आणि चित्रपट अभिनेता आहे. त्यांनी माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय दहिवडी येथुन केले आहे. तो व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असून आयुर्वेद एमएस पदवीधर आहे.

झी मराठी वरील रिॲलिटी शो महाराष्ट्राचा सुपरस्टार जिंकुन आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली. त्यानतंर प्रसिद्दी होम मिनिश्टर व् फु बाय फू या मालिकेमार्फत मिळाली. तो नायक म्हणतात नवरा माझा भवरा मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. पुढे तो झी मराठी विनोदी शो चला हवा येऊ द्या होस्ट करू लागला, आपल्या अभिनयाने तसेच लेखणीतून तो एकचढ़ एक विनोदाचे डोंगर रचू लागला. पुढे झी वाहिनेने त्याला त्या शोचा डायरेक्टर हि बनवलं. सध्या तो पुण्यात आपल्या पत्नी गौरी सोबत पुण्यात स्थायिक आहे.

सागर कारंडे

sagar karande
सागर कारंडे यांचा १ जानेवारी १९८० साली पुण्यात जन्म झाला. शालेय जीवनापासून अभिनय आवड असणार हरहुन्नरी कलाकार आहे. त्याने बरीच नाटके आणि लाईव्ह स्टेज शो केलेत. विविध कलाकाराची मिमिक्री करता करता त्याला फूबाई फु मालिकेत एन्ट्री मिळाली. तिथे तो विनोदाचा अस्टपैलू कलाकार म्हणून समोर आला. “नाना पाटेकर, निळू फुले, मकरंद अनासपुरे, गब्बर” याची हुबेहूब नक्कल करून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली.

कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग इंजिनिअर असून त्याने एका आटी पनीत काम हि केलंत. ते काम त्याला खूपच कंटाळवाणं वाटू लागलं म्हणून त्याने नोकरी सोडली. २००२ साली त्याने “गणपती बाप्पा मोरया” ह्या नाटकापासून पूर्ण वेळ कलाकारिकेला सुरवात केली.

सध्या चला हवा येऊ द्या मालिकेत तो अनेक विनोदी भूमिका साकारतोय. नुकताच मुंबईत त्याने मुंबईत फ्लॅट घेतलाय जिथे तो त्याची पत्नी आणि मुलीसोबत राहतो.

कुशल बद्रीके


कुशल बद्रीके यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९८० साली कोल्हापूर येथे झाला. शालेय जीवनापासूनच तो अनेक स्टेज शो मध्ये सहभाग घेत होता. अनेक मराठी चित्रपटांत त्यांनी कामे केली. जत्रा या चित्रपटापासून तो लोकांच्या परिचयाला आला. पुढे बकुळ नामदेव घोटाळे, डावपेच, भाऊंचा धक्का, माझा नवरा तुझी बायको असे अनेक चित्रपट केले.

“फूबाई फु” या रियालिटी शो मध्ये त्याने विनोदाचं परफेक्ट टाईमिंग आणि उस्फुर्त अभिनयाची सांगड घातली. सध्या विनोदी शो चला हवा येऊ द्या मध्ये काम करतोय. आपली पत्नी आणि मुलासोबत डोंबिवली मुंबई इथे स्थायिक आहे.

श्रेया बुगडे

श्रेया बुगडे हीच जन्म २ फेब्रुवारी १९८८ साली पुण्यात झाला. पुढे वडिलांची ट्रान्सफर मुंबईत झाली म्हणून सर्व बालपण मुंबईतच गेलं. मुंबईतल्या विठाबाई कॉलेज मधून शिक्षण घेतलं. तिने मराठीच नव्हे तर अनेक गुजराती नाटकांतही कामे केलीत. “चला हवा येउ द्या” ह्या कार्यक्रमात ती एकुलती एक महिला कॉमेडी कलाकार आहे. निखिल सेठे याच्या सोबत काही वर्षां पूर्वीच त्यांचं लग्न झालं.

अनेक मराठी तसेच हिंदी अभिनेत्रीच्या नकला त्या हुबेहूब संकजरताना पाहायला मिळतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *