गोठ मालिकेतील बयो आजीचा भाऊ “बाबी” बद्दल माहित नसलेल्या गोष्टी .. पत्नीने दिली बिकट प्रसंग साथ नाहीतर

स्टार प्रवाह वरील “गोठ” मालिकेतील बयो आजीच्या भावाची म्हणजेच “बाबी”ची भूमिका अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांनी सुरेख साकारली. प्रथमच छोट्या पडद्यावरील नाच्याची भूमिका ही विरोधी भूमिका असली तरी प्रेक्षकांनी त्यांच्या भूमिकेचे भरभरून कौतुक केलेले पाहायला मिळाले. यापूर्वीही अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके यांनी बायकांची व्यक्तिरेखा साकारल्या आहेत पण हि भूमिका जरा हटके आहे आणि ती साकारायला खूप मेहनत लागली असं हि ते सांगतात.


“फु बाई फु ” च्या तिसऱ्या पर्वात पार्टीसिपेट करून सिद्धेश्वर यांनी विनोदी अभिनयाची छाप प्रसक्षकांच्या मनात पाडली. यामुळे त्यांना पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा, झांगडगुत्ता, वळू, जुगाड, नटरंग यासारख्या चित्रपटात विविधरंगी भूमिका साकारण्याची संधी मिळाली.’ वाडा चिरेबंदी’, ‘आबाकी आयेगी बारात’,’५० पैकी ४७ फक्त’, १०० डेज, सरस्वती, कुंकू, आंबटगोड सारखे नाटक आणि मालिका क्षेत्रात त्यांनी आपला जम बसवला. पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी “शर्व एंटरटेनमेंट ” द्वारे अभिनय कार्यशाळा आयोजित करून अनेक कलावन्त त्यांनी घडवले आहेत.
सिद्धेश्वर यांच्या पत्नी शर्वरी यानिदेखील आपला लेडीज शॉपी चा व्यवसाय सांभाळत ” गाव माझा न्यूज चॅनल” साठी एक मुलाखतकार म्हणून कार्य पार पाडले आहे. सिद्धेश्वर झाडबुके सुरवातीला अभिनय क्षेत्रात जम बसवेपर्यंत त्यांना त्यांच्या पत्नीने खूप साथ दिली त्यांच्याच छोट्याश्या व्यवसायामुळे त्यांचं घर हि भागायचं, तिने साथ दिली नसती तर ह्या मुंबईसारख्या मायानगरीत पाय हि ठेवणे शक्य नव्हते, हि गोस्ट सिद्धेश्वर आजही आवर्जून सांगतात.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *