गेले ४-५ महिन्यापासून बंदी केलेले “रुहअब्जा” शीतपेय पाकिस्तान भारतात पाठवण्याच्या प्रयत्नात …बंदी घालून आता सांगतोय हे कारण

गेली अनेक वर्षांपासून “रुहअब्जा” या शीतपेयाला भारतात विशेष मागणी असल्याचे आढळते. गुलाब, वेगवेगळी फळे यांपासून बनवण्यात आलेले हे सिरप उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासापासून थोडीशी मुक्तता देते. त्यामुळेच उन्हाळ्यात या शितपेयाला भरपूर मागणी असते. खूप आधी बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिने ह्या ब्रँडची जाहिरात केलेली बहुतेकांना आठवत असेल त्यामुळे रुहअब्जा ह्या शितपेयाची मागणी भारतात वाढत गेली. परंतु ऐन उन्हाळ्यात म्हणजेच जवळपास ४ ते ५ महिन्यांपासून हे पेय पाकिस्तान भारतात पाठवण्यावर बंदी घालत होते.

१९०६ साली गाझियाबाद येथे हे उत्पादन तयार करण्यात आले. “हमदर्द लॅबोरेटरीज” पाकिस्तान स्थित असलेली ही कंपनी गेल्या काही महिन्यांपासून भारतात हा माल विक्रीस आणत नव्हता. भारतात हे पेय कुठेच मिळत नसल्याने त्याच्या चाहत्यांनी ही बाब समोर आणून दिली होती. त्याच्यावर पाकिस्तान सरकारची मुख्य कार्यकारी “उस्मा कुरेशी” यांनी ह्यावर उत्तर दिले आहे की, ‘रुहअब्जा हे शीतपेय बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या तुडवड्यामुळे आम्ही ते भारतात पाठवत नसल्याचे कारण त्यांनी समोर आणले.
नुकताच रमजान महिना सुरू झाला आहे भारत सरकारची परवानगी असेल तर आम्ही हे शीतपेय भारतात वाघा बॉर्डर द्वारे पाठवू इच्छितो ‘ अशीही माहिती आता समोर येत आहे. दिल्ली येथेही हमदर्द लॅबोरेटरीज ही संस्था अनेक सालापासून कार्यरत आहे परंतु तुर्तास त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद समोर आला नाही.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *