वडापाव म्हटलं कि मुबईची आठवण येते. वडापाव हा मुंबईचा म्हणून ओळखला जातो असे बऱ्याच लोकांचे मत असते. पण थोडं थांबा वडापावचा इतिहास पाहता तो चक्क पुण्यातील श्रीमंत माधवराव पेशवे (पहिले) यांच्या कारकिर्दीत बनविण्यात आला होता. विश्वास बसत नाहीये ना? होय पण हे सत्य आहे. विकिपेडिया आणि गूगलने नुकतंच याला दुजोरा दिलाय. मुंबईकरांना हि बाब रुचणार नाही पण वडापाव हा पुण्याचाच हे तितकाच सत्य. वडापाव ह्या पदार्थाचे दोन मूळ भाग आहेत एक वडा आणि दुसरा म्हणजे पाव. उकडलेला बटाटा कुस्करुन, त्यात मिरची, कोथिंबीर, आले, लसूण, हळद, कढीलिंब, वगैरे मिसळून, त्याला हिंग-मोहरीची फोडणी देतात. अशाप्रकारे तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करून पाण्याने पातळ केलेल्या चण्याच्या पिठात बुडवून त्यांना मध्यम गरम तेलात तळून वडे बनविले जातात.

हि साधी सोपी पद्धत सर्च ठिकाणी जशीच्या तशीच वापरली जाते. पण बनवणाऱ्याच्या हातातील कलेमुळे खवय्ये त्यांच्याकडे खेचले जातात. असेच एक ठिकाण आहे पुण्यातील कॅम्प परिसरातील जे. जे. गार्डन वडापाव बनवणाऱ्यांच्या हाताला. पुण्यातील जे. जे. गार्डन वडापाव खूपच फेमस आहे याची प्रचिती येते ते येथील वडापावच्या समोर असलेल्या तुफान गर्दीला पाहून. जे. जे. गार्डन वडापाव हा भाग गवळी वाडा म्हणून प्रसिद्ध होता. कदाचित तुम्हाला माहित नसेल गार्डन वडापाव मालक हेही गवळीच आहेत. गवळी वाड्यात हा वडापण बनवून त्या ठिकाणी आणि जे. जे. गार्डन अश्या जवळपासच्या २ ठिकाणी हा वडापाव विकला जातो. जे. जे. गार्डन वडापाव यांचा फक्त वडाच फेमस नाही तर त्या सोबत देण्यात येणारी चटणीसाठी हि ते तितकेच प्रसिद्ध आहेत. त्यांनी चक्क वडापाव सोबत देण्यात येणाऱ्या छाटणीचेही पेटंट बनवून घेतले आहे. भलामोठा पाव असूनही त्यात न बसणार वडा म्हणून जे. जे. गार्डन वडापाव चवीलाही चांगलाच प्रसिद्ध आहे. जगातील प्रथम क्रमांकाचा वडापाव म्हणून जे. जे. गार्डन वडापाव कडे पहिले जाते. दिवसभारत किमान ७००० वडापाव दररोज एकाच ठिकाणी बनवण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. गेली अनेकवर्षे ते वडापाव बनवत आहेत. आणि दरवर्षी त्यांच्या संख्येत वाढ झालेली दिसते.

इतकेच काय इनकम टॅक्स विभागाने दहाड टाकलेला हा जगातील एकमेव वडापाव सेंटर आहे. याचे झाले असे कि काही वर्षांपूर्वी इनकम टॅक्स विभागाला जे. जे. गार्डन वडापाव भरत असलेल्या टॅक्स वर विश्वास बसत नव्हता. मग त्यांनी चक्क वडापाव सेंटरवर धाव घेऊन तेथे दहाड टाकली. पण वडापाव किती बनवले हे समजणे कठीण होते कारण जमा झालेले पैसे बँकेत भरले जायचे किंवा इतर ठिकाणी वापरले जायचे. मग इनकम टॅक्स विभागाने शक्कल लढवली. जे. जे. गार्डन वडापाव हे वडापाव देताना एका खास पेपरचा वापर करतात वडापाव खाऊन झाला कि तो कागद तसाच कचऱ्याच्या पेटित टाकला जायचा. मग त्यांनी चक्क वडापाव देण्याचे कागद त्या कचऱ्याच्या पेटितुन बाहेर काढून मोजायला सुरवात केली. भारतातच काय पण जगात कोठेही इनकम टॅक्स विभागाने अश्या प्रकारे दहाड टाकलेली हि पहिली आणि शेवटची वेळ. त्यामुळे तुम्ही कधी पुण्याच्या कॅम्प परिसरात आलात तर फक्त १५ रुपयांना मिळणाऱ्या ह्या वडापावची चव चाखायला आणि त्यासोबत मिळणाऱ्या थंडगार ताकाचा आस्वाद घ्यायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *