“गणेश आचार्य ” या प्रसिद्ध कोरिओग्राफर ची पत्नी आहे “ही” बॉलिवूड फिल्म निर्देशक…दिसते अभिनेत्रींनहून खूपच सुंदर

स्वप्नील जोशी, रुची इनामदार यासारखी स्टार कास्ट असलेला “भिकारी ” या चित्रपटाचे दिगदर्शन करून प्रसिद्ध कोरिओग्राफर “गणेश आचार्य” याने मराठी सिने सृष्टीत पाऊल टाकले. याआधीही त्याने “स्वामी” चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेऊयात… १४ जून १९७१ साली चेन्नई, तामिळनाडू येथे गणेश आचार्यचा जन्म झाला. त्याचे वडील कृष्ण गोपी हेदेखील कोरिओग्राफर म्हणून प्रचलित होते. गणेश जेव्हा १० वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले.


बहीण “कमल” हिच्याडुन त्याने नृत्याचे धडे गिरवले. पुढे अवघ्या १९ व्या वर्षी कोरिओग्राफर म्हणून नावारूपास आला आणि १९९२ सालच्या “अनाम” चित्रपटात कोरिओग्राफर चे काम करण्याची संधी मिळाली. २००१ साली प्रदर्शित झालेल्या “लज्जा” चित्रपटातील माधुरी दीक्षित, मनीषा कोईराला वर चित्रित झालेले ‘ बडी मुश्किल ….’ ह्या गाण्याचे नृत्य निर्देशन केले. गणेश स्वतः माधुरी दीक्षित आणि गोविंदाचा फॅन आहे.यानंतर त्याने बॉलिवूड मधील बिडी जलइले, रंग दे बसंती, ऐसा जादू डाला रे सारख्या हिट गाण्यांचे नृत्य दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. ABCD या चित्रपटात त्याने अभिनयही साकारला आहे.
गणेश आचार्यच्या पत्नीचे नाव विधी आचार्य . बॉलिवूड चित्रपट “हे ब्रो” चे निर्देशक म्हणून तिने काम पाहिले आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका स्वतः गणेश आचार्य याने साकारली होती. विधी आणि गणेश यांना सौंदर्या नावाची मुलगी आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *