खासदार असूनही डॉ अमोल कोल्हे दिसणार एका नव्या मालिकेत.. पहा कोणती आहे हि मालिका

“स्वराज्यरक्षक संभाजी” या लोकप्रिय मालिकेनंतर डॉ अमोल कोल्हे पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. आजवर या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन तर केलेच आहे शिवाय संभाजी महाराजांचा खरा इतिहास प्रेक्षकांसमोर आणल्याने त्याचे कौतुकही होत आहे. तसे पाहता डॉ अमोल कोल्हे या कलाकाराने अनेक ऐतिहासिक मालिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या मग त्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका असो वा संभाजी महाराज यांची भूमिका त्यांनी अगदी चोख बजावलेली पाहायला मिळते.

अशाच धाटणीची आणखी एक मालिका डॉ अमोल कोल्हे साकारताना दिसणार आहेत. सोनी मराठी या वाहिनीवर “स्वराज्य जननी जिजामाता” ही ऐतिहासिक मालिका १९ ऑगस्ट पासून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रोमो डॉ अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर शेअर केला. जगदंब क्रिएशन्सची ही दुसरी निर्मिती असलेली मालिका जिजाऊ माँसाहेब यांचे जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर साकारणार आहे.स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेनंतर हे एक वेगळं शिवधनुष्य पेलण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं आहे.
या मालिकेचे स्वागत देखील सोशल मीडियावर केलेले पाहायला मिळत आहे. ही मालिका केवळ मनोरंजन नाही तर संस्कार असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाचा हुंकार असेल!!! अशा शब्दात या मालिकेचे वर्णन केले जात आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *