“खंडेराया झाली माझी दैना ” फेम ह्या अभिनेत्री बद्दल बरंच काही…पाहण्यासाठी फोटो

“खंडेराया झाली माझी दैना” गाण्याने अख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातली आहे. तेजस पाटील दिग्दर्शित वैभव लोंढे याने गायलेलं आणि अभिनित केलेलं हे गाणं तरुणाईला आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहे. पहिल्याच दिवशी या गाण्याला एक लाखाहून अधिक विव्हज मिळाल्या असल्याचे समोर आले होते. खंडेराया … या गाण्यातील ही मराठमोळी तरुण सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या तरुणीचे नाव आहे ‘ईशा पाठक’ ( साईशा ) . ईशा पुण्यात वाढलेली मुलगी. पुण्यातील भारती विद्यापीठ येथून तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

२०१५ साली ” महाराष्ट्र श्रावण क्वीन ” चा ‘किताब ईशा पाठक ने पटकावला होता. काही ब्रँड साठी तिने मॉडेलिंगही केले आहे. नृत्याची आवड असल्याने तिने स्वाती दैठकर यांच्याकडून नृत्याचे धडे गिरवले आहेत. क्लासिकल डान्समधून तिने नुकतीच मास्टर ची डिग्री प्राप्त केली आहे. गायक, कंपोजर वैभव लोंढे यांच्याच ‘भिजलेली तू’ या गाण्यात तिला पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली होती. या गाण्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
गीतकार, गायक तसेच डायरेक्टर म्हणून ओळखले जाणारे “वैभव लोंढे” यांच्या आवाजात ‘खंडेराया झाली माझी दैना’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुती असलेल्या या गाण्याची निर्मिती चेतन गरुड प्रॉडक्शनने केली आहे. यापूर्वीही वैभव लोंढे यांनी सुपरहिट मराठी गाणी दिलीत. “सांग दुसरा कोण” “प्रेमयाच्या ह्या खुणा” आणि “झकास तू” अश्या नेहमी गुणगुणत राहाव्या अश्या गाण्याची निर्मिती त्याने केली.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *