क्राईम पेट्रोल मधील ह्या सुंदर अभिनेत्री बद्दल तुम्हाला हे माहित आहे का? वाचून थक्क व्हाल

क्राईम पेट्रोलचे अनेक भाग आजवर तुम्ही पाहिले असतील. हिंदी मालिकांमध्ये सध्या टॉप मालिकांमध्ये ह्या सेरीज कडे पाहिले जाते. सत्य घटनेवर आधारित लोकांच्या आयुष्यात घडलेल्या घटना ह्या मालिकेत दाखवल्या जातात. प्रत्येक भागात ह्यासाठी नवनवीन अभिनेते घेतलेले पाहायला मिळतात. पण एक अभिनेत्री आपल्याला खूप वेळा वेगवेगळ्या एपिसोड मध्ये पाहायला मिळाली. त्या सुंदर महिलेचं नाव आहे “दिपाली मुचळीकर”. होय हि एक मराठी अभिनेत्री आहे आणि ह्या पूर्वीही तिने काही मराठी चित्रपट हि केले आहेत.

दिपाली मुचळीकर हिचे वडील मूळचे मुंबईचे पण आई ग्वालियरची असल्याने तिचे बालपण ग्वालियर मधेच गेले. नंतर ती मुंबईत आली. वडील महाराष्ट्रीयन असल्याने तिच्या घरी मराठीच बोलली जाते. २०१५ साली तिने मराठी इंडस्ट्रीत पहिले पाऊल टाकले. रेणुका शहाणे यांच्यासोबत तिने पहिला मराठी चित्रपट साकारला त्याच नाव “ते आठ दिवस”. पण चित्रपटात तिला पाहिजे तितकं यश मिळालं नाही. पण त्यानंतर तिने केलेला “टिकली आणि सुतळी बॉम्ब” चित्रपट तिच्यामुळे चांगलाच गाजला. तिचा अभिनय पाहता तिला हिंदी मालिकेच्या अनेक ऑफर्स आल्या आणि त्यामुळेच ती क्राईम पेट्रोल मध्ये चांगलीच चर्चेतर राहिली.
काही दिवसांपूर्वी सोनी मराठी वर “जुळता जुळता जुळतंय कि” ह्या मालिकेत ती प्रमुख पात्र साकारत आहे. हिंदीत इतकं यश मिळूनही एकदा हिंदीकडे वळलेली हि सुंदर अभिनेत्री पुन्हा मराठीकडे वळलेली हि पहिलीच अभिनेत्री असावी. दिपाली मुचळीकर हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *