kombadi palali actress twins

‘जत्रा’ चित्रपटातील कोंबडी पळाली…या गाण्यामुळे क्रांती रेडकर या अभिनेत्रीला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. ‘सून असावी अशी’ या मराठी चित्रपटातून तीने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. माझा नवरा तुझी बायको, फुल ३ धमाल, लाडीगोडी, फक्त लढ म्हणा अशा मराठी चित्रपटासोबतच गंगाजल या हिंदी चित्रपटातही ती झळकली. काकन या चित्रपटाच्या माध्यमातून तीने दिग्दर्शन क्षेत्रात यशस्वीपणे पाऊल टाकले. मराठी सृष्टीत नावारूपास आलेली ही अभिनेत्री २०१७ साली “समीर वानखेडे ” या आयपीएस अधिकाऱ्यासोबत विवाहबंधनात अडकली. या लग्नाला तिने काही खास आणि जवळच्याच मित्रमंडळींना आमंत्रित केले होते. लग्नानंतर ३ डिसेंबर २०१८ साली क्रांतीने जुळ्या मुलींना जन्म दिला.

kranti redkar twins
kranti redkar twins

तिच्या या दोन्ही मुली आता दीड वर्षांच्या आहेत. इन्स्टाग्रामवरून क्रांती नेहमीच आपल्या मुलींसोबतची धमाल मस्ती करतानाचे व्हिडीओ शेअर करत असते परंतु यात विशेष सांगण्याची बाब म्हणजे तीने कधीच आपल्या या दोन्ही मुलींचे चेहरे सोशल मीडियावर दाखवले नाहीत. अगदी पाठमोऱ्या असतानाच त्यांचे व्हिडीओ तीने शेअर केल्याने त्या कशा दिसतात याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली होती आणि याबाबत तिच्या चाहत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली. त्यांची नाराजी समजून घेत नुकतीच क्रांती रेडकरने यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे त्यात तीने आपल्या दोन्ही मुलींचा चेहरा न दाखवता म्हटले आहे की, “मला माहित आहे की, फोटोतील हे दोन चेहरे तुम्हाला पहायची ईच्छा आहे परंतु सध्या मलाच सहन करा. त्यांचे फोटोज शेअर न करणं हा एक ठरवून घेतलेला डिसीजन आहे. तुमच्या अतुरतेचा मी रिस्पेक्ट करते. त्या मोठ्या झाल्या की त्यांचे फोटोज त्या स्वतः शेअर करतील किंवा नाही, तो त्यांचा निर्णय असेल. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांच्यावर कायम राहू द्या.” असे म्हणून तिने आपल्या मुलींबाबत घेतलेल्या निर्णयाचे चाहत्यांनी स्वागतच केलेले पाहायला मिळते आहे. त्यामुळे तूर्तास तरी क्रांती रेडकरच्या निर्णयामुळे तिच्या मुलींचे चेहरे चाहत्यांना पाहायला मिळणार नाहीत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *