aggabai sasubai pradnya

दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसत अशी म्हण येथे तंतोतंत पाहायला मिळते. आपल्या अभिनयाने विरोधी भूमिका रंगवून प्रेक्षकांच्या मनात राग आणायला लावणे हे खरं तर खूप मोठे जिकरीचे काम. अशीच काहीशी भूमिका गाजवणारे कलाकार नकळत का होईना प्रेक्षकांकडून शिव्यांची लाखोली वाहुन घेताना दिसतात, हीच त्या कलाकारांच्या सजग अभिनयाची खरी पावती म्हणावी लागेल. अग्गबाई सासूबाई या मालिकेतून विरोधी भूमिका गाजवणाऱ्या प्रज्ञा कारखानीस या पात्राने देखील प्रेक्षकांच्या मनात आपले असेच एक वेगळे स्थान निर्माण केलेले दिसते. हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीविषयी आज जाणून घेऊयात…

actress sanjeevani sathe
actress sanjeevani sathe

मालिकेत प्रज्ञाचे पात्र साकारले आहे “संजीवनी साठे” या अभिनेत्रीने. संजीवनी साठे या मूळच्या पुण्याच्या परंतु कामानिमित्त त्या सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. अग्गबाई सासूबाई ही तिने साकारलेली मराठीतील पहिलीच टिव्ही मालिका असली तरी याआधी तिने रंगभूमीवरील अनेक नाटकं गाजवली आहेत. सुरुवातीला हौशी नाटक, एकांकिका स्पर्धेत सहभागी होऊन तिने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकून घेतली.”पहाता पहाता जमलं” हे तिने साकारलेले पहिले व्यावसायिक नाटक. यासोबतच गुजराती भाषा आत्मसात करून तिने गुजराती रंगभूमीवरदेखील पदार्पण केले. “कुहू छु संबळो छे”, “बलवंत अँड बबली”, “विरार फास्ट” ही गुजराती नाटके तिने आपल्या अभिनयाने चांगलीच गाजवली होती. रसिक प्रेक्षकांकडून परदेशात देखील या नाटकांना तुफान असा प्रतिसाद मिळाला होता. एका मराठी अभिनेत्रीने गुजराथी नाटकासाठी अमेरिकेत दोनदा जाऊन दोन्ही वेळेस अमेरिका गाजवणे हे खरंच कौतुकास्पद काम आहे. अमेरिकेत जाऊन पेक्षकांची वाहवाह मिळवणे खूपच अवघड काम आहे ते अगदी शिताफीने करणारी हि अभिनेत्री मराठी मालिकेतही आपला ठसा उमठवण्यात यशस्वी होताना पाहायला मिळते.

sanjivanisathe actress
sanjivanisathe actress

तिने याआधी साकारलेली मराठी नाटके लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. आमचं जमलं बरं का, डोळे मिटून उघड उघड, सासूबाईचं असंच असतं ही मराठी नाटकं साकारून तिने काही मोजक्या गुजराती भाषिक मालिकेत देखील काम केले आहे. अग्गबाई सासूबाई मालिकेत तिने साकारलेली खोडकर प्रज्ञा आपल्या कटकारस्थानामुळे प्रेक्षकांच्या चांगलीच परिचयाची बनली आहे. त्याचमुळे हे पात्र प्रकाशझोतात आलेले पाहायला मिळते. मालिकेत तर ती आसावरीविरुद्ध नेहमीच डाव आखताना दिसते तसे तिचे प्रत्येक डाव आजोबा नाहीतर शुभ्राकडून कसे हाणून पाडले जातात हे पाहणे प्रेक्षकांना जास्त आवडते. याच मनोरंजनामुळे हे पात्र या मालिकेची गरज आहे असे म्हणायला हरकत नाही. आसावरीचा मुलगा सोहमला आपल्या जाळ्यात ओढताना ती पाहायला मिळते इतकाच काय तर सोहमला वेगवेगळी कटकारस्थाने करायला भाग पाडते. असावरील आणि अभिजीतराजेंना लग्नानंतरही आपापसापासून दूर करण्यासाठी आता प्रज्ञा आणखीन काय काय खेळ रचणारी हे पुढील काही भागात पाहायला मिळेल. तूर्तास संजीवनीने साकारलेल्या प्रज्ञाच्या या भूमिकेसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा!!!…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *