कॉमेडीची बुलेट फेम “अतुल तोडणकरची” पत्नी आहे हि बॉलीवूड अभिनेत्री

अभिनेता “अतुल तोडणकर” फु बाई फु च्या शो मधून प्रेक्षकांसमोर आला होता. २०१० च्या या सिजनमध्ये त्याने अनेक स्त्रीपात्रातील विनोदी भूमिका साकारल्या होत्या. त्याच्या या भूमिका प्रेक्षकांनाही तितक्याच आवडल्या. जल्लोष सुवर्णयुगाचा ह्या डान्स शो मध्ये भारी भक्कम शरीरयष्टी असूनही अगदी सहजपणे आणि उत्तम डान्स त्यांनी सादर केला. अनेक ऍवॉर्ड फंगशन मधेही ते आपल्या नृत्याने इतरांना अचंबित करून टाकतात. त्यांची विनोदशैली इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे.

पुढे कॉमेडीची बुलेट ट्रेन, कॉमेडी कॉकटेल यासारख्या शो मध्येही तो झळकला. विनोदी भूमिकांसोबत त्याने काही चित्रपटांत वेगळ्या धाटणीच्याही भूमिका साकारल्या. अकल्पित, अवतार, लादेन आला रे, व्हॉट अबाउट सावरकर? मध्ये त्याने छोट्या मोठया भूमिका साकारल्या. फुल 2 धमाल, करायला गेलो एक आणि अप्पाजींची सेक्रेटरी या नाटकालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे अतुल अनेक अवॉर्डच्या इव्हेंट मध्ये परफॉर्मन्स करताना दिसतो.
अतुल तोडणकर याच्या पत्नीचे नाव माधुरी काळे- तोडणकर . माधुरी देखील बॉलिवूड क्षेत्राशी निगडित आहे. तसेच हिंदी मालिकांमध्येही त्या पाहायला मिळतात. त्यांनी काही व्यावसायिक जाहिराती देखील साकारल्या आहेत. अतुल आणि माधुरी याना एक मुलगा आहे. सध्या ही फॅमिली मुंबईत स्थायिक आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *