दीपक देऊळकर कॉलेज मध्ये असताना भारतीय अंडर 19 क्रिकेट संघात उत्कृष्ट स्पिनर म्हणून भूमिका बजावत होते. त्यावेळी त्यांची ती उत्कृष्ट कामगिरी पाहून पुढे ते भारतीय संघात पदार्पण करतील अशी अनेकांना आशा होती. पण सराव करताना हाताच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे क्रिकेट खेळापासून वंचीत राहावं लागलं. आपण पाहिलेलं स्वप्न आता आपण पूर्ण करू शकणार नाही ह्याची खंत त्यांच्या मनात कायम आहे. पुढे न डगमगता त्यांनी अभिनय क्षेत्रांत पाऊल टाकायचे ठरवले. सुरवातीला काही मराठी नाटकं त्यांनी खूप उत्कृष्ट रित्या साकारली.

“कृष्णा” या हिंदी मालिकेतील ‘बलराम’ची भूमिका त्यांनी साकारली होती. ह्या मालिकेने त्यांना प्रसिद्धी तर दिलीच शिवाय संपूर्ण आयुष्य बलून जगण्याची नवी उमीद निर्माण झाली. लेक लाडकी ह्या घरची,दामिनी,बंदीनि या मालिकेतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. नायकाची भूमिका असो किंवा खलनायकाची तितक्याच अभिनय क्षमतेने त्या प्रेक्षणसमोर मांडल्या. एका व्हील साबणाच्या जाहिरातीत लीड रोल करताना पहिल्यांदी निशिगंधा वाड आणि
दीपक देऊळकर यांची ओळख झाली. पुढे ह्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. पण लागण्यासाठी त्यांना तब्बल ३ वर्ष लग्नाची वाट पाहावी लागली आणि उशिरा काय होईना ह्या दोघांनी लग्न केलं. निवेदिता आणि अशोक सराफ ह्या जोडीने ज्या मंदिरात लग्न केलं अगदी तिथेच ह्या दोघांचंही लग्न झालं ते ठिकाण म्हणजे गोव्यातील मंगेशी मंदिर. निशिगंधा आणि दीपक यांनी अनेक मराठी चित्रपटात एकत्रित काम केले आहे.’वाट पाहते पुनवेची’,सासर महेर या मराठी चित्रपटात भूमिका केल्या. अभिनयाला जोड देत ‘साद’ या चे लेखनही दिपक यांनी केले आहे.दोघांना ईश्वरी नावाची सुंदर मुलगी आहे.

मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेलं सर्वोत्तम व्यक्तिमत्व म्हणजे निशिगंधा वाड होय. मराठी भाषेवरील प्रभुत्व, बोलण्यातील लयबद्धता यामुळेही निशिगंधा वाड ओळखल्या जाऊ लागल्या. मुळातच आई विजया वाड ह्या प्रसिद्ध लेखिका, शिक्षिका आणि वडील डेंटिस्ट भारतीय सैन्य दलात जाऊन भारत पाक युद्धातील उत्तम कामगिरीमुळे गौरविलले ,त्यामुळे मोठि बहिन प्राजक्ता आणि निशिगंधा यांच्यावर लहानपणापासूनच चांगले संस्कार झालेले. १० मध्ये त्या मेरिटमध्ये महाराष्ट्रात पहिल्या ५० मध्ये मन पटकावला. अत्यंत हुशार अशी निशिगंधा पुढे डॉक्टर झाली. पण तिचा काळ अभिनयाकडे वळाला आणि त्यातही तिने उत्कृष्ठ कामगिरी केली. मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिका तितक्याच दमदार होत्या त्यामुळे एक सशक्त अभिनेत्री म्हणून त्यांचे नाव उदयाला आले. बाळा जो जो रे,शेजारी शेजारी, बंधन ,एकापेक्षा एक,सासर माहेर अशा कित्येक मराठी चित्रपटात काम करून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. तुमको ना भूल पायेगे,दिवानगी,दादागिरी,आप मुझे अच्छे लागने लगे या हिंदी चित्रपटात देखील काम केले. सहज सुंदर अभिनयाने हिंदी मराठी टिव्ही मालिकेतील भूमिकेलाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.”ससुराल सीमर का “या हिंदी मालिकेतील सुजाता भारद्वाज ची भूमिका तितकीच भाव खाऊन गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *