anushka sarkate pic

झी मराठी वाहिनीवरील “तुझ्यात जीव रंगला” ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी येत्या २ नोव्हेंबरपासून वाघोबा प्रॉडक्शनची “कारभारी लय भारी” ही मालिका प्रसारित होत आहे. लागींर झालं जी या मालिकेत विक्याची भूमिका साकारणारा निखिल चव्हाण कारभारी लय भारी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. तर प्रमुख नायिका साकारत आहे “अनुष्का सरकटे” ही अभिनेत्री. या मालिकेनिमित्त अनुष्का एक नवा चेहरा बनून प्रेक्षकांसमोर आली असली तरी याअगोदर तीने एका मालिकेतून प्रमुख नायिकेची भूमिका बजावली होती. तिच्याबद्दल आज अधिक जाणून घेऊयात…

marathi serial actress
marathi serial actress

अभिनेत्री अनुष्का सरकटे ही मूळची औरंगाबादची. शालेय शिक्षण घेतल्यावर अनुष्काने गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश मिळवला. मास्टर्स इन कम्प्युटर ऍप्लिकेशनची पदवी प्राप्त करून झाल्यावर तिने थेटर आर्टस् जॉईन केले. पुण्यातील ललित कला केंद्र मध्ये अभिनयाचे धडे गिरवल्यावर तीने जवळपास चार वर्षे रंगभूमीवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. पुढे कलर्स मराठीवरील “श्री लक्ष्मीनारायण” या लोकप्रिय मालिकेत तिला श्री लक्ष्मीमातेची मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. अनुष्काचे वडील संजय सरकटे हे संगीत क्षेत्राशी निगडित आहेत. ‘स्वरविहार’ या संगीत मैफिलीच्या व्यवस्थापकीय संचालक पदी ते कार्यरत आहेत. अनुष्का आता झी मराठी वाहिनीवर झळकते आहे म्हटल्यावर तिच्या आई वडिलांना देखील खूपच आनंद झाला आहे. अनुष्काला तिच्या या नव्या मालिकेसाठी आमच्या टीम कडून खूप खुप शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *