कापड्यांवरील चिखलाचे,पानाचे, शाईचे, ऑईलचे डाग चुटकीसरशी घालवा ह्या सोप्या पद्धतीने.

पावसाळ्यात कपड्यांवर चिखलाचे डाग पडतात. हे डाग सहजरीत्या जात नसल्याने त्रासदायक वाटतात. अशाच प्रकारे शाईचे डाग ,ऑईलचे , ग्रीसचे डाग , पानाचे डाग सहजासहजी निघत नसल्याने कधीकधी ते कपडे टाकून द्यावेसे वाटतात. पण काही कपडे असेही असतात जे टाकून देऊ शकत नाही आपणास ते कपडे वेळोवेळी लागतात. उदा. कामाला जायचे कपडे, शाळेचे कपडे अशावेळी पुढील सोप्या आणि घरगुती पद्धतीने तुम्ही असे डाग सहज काढू शकता…

१.चिखलाचे डाग- बहुतेकवेळा कापड्यावरील चिखलाचे डाग धुवुनदेखील निघत नाहीत. पांढऱ्या कपड्यावर तर असे डाग नकोसे वाटतात. अशावेळी कच्च्या बटाट्याचा चोथा करून ती पेस्ट डागांवर लावून ठेवावी. थोड्यावेळाने हे कपडे धुतल्यास डाग लगेचच निघून जातात.

२. पानाचे डाग- पानाचे चिवट डाग अगदी नकोसे वाटतात. ते सहज निघावे यासाठी थोडा चुना डागावर लावावा. तासाभरानंतर चोळून धुवून काढावा. लिंबाच्या रसाचा देखील इथे वापर केल्यास असा डाग लगेचच निघून जाण्यास मदत होते.
३. शाईचे डाग- लहान मुलांच्या शाळेतील कपड्यावर असे डाग नेहमीच पाहायला मिळतात. अशावेळी लिंबू आणि मीठ एकत्रित करून डागावर चोळल्याने डाग निघून जाण्यास मदत मिळते.
४. फळांचे डाग- अशावेळी कुठल्याही औषधांची गोळीची पूड करून डागावर चोळल्यास निश्चितच फायदा होईल.
५. ऑईलचे डाग- कपड्यावर लागलेले ऑईलचे डाग तितकेच चिवट असतात. निलगिरीच्या तेलाचा वापर केल्यास असे डाग सहज निघून जातात. तसेच लिंबाचा रस देखील असे डाग निघून जाण्यासाठी फायदेशीर ठरतात. कपड्यावर वंगणचे डाग असतील तर अशावेळी टरपेटाईन किंवा रॉकेल वापरणे सोईस्कर ठरते.
६. रंगाचे डाग- रंगाचे डाग निघावेत यासाठी नेलपेंटचे रिमूव्हर किंवा रॉकेल लावून काढावेत. ज्या जागी गडदरंग असतील अश्या ठिकाणी कोलगेट लावून थोडं सुकून मग कपडे धुवावेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *