“कानाला खडा” मध्ये फुल राडा…या ‘खतरनाक’ हिरोची होणार एन्ट्री

“कानाला खडा” या झी मराठीवरील शोमध्ये आजवर अनेक कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. दिलखुलास आणि स्पष्ट व्यक्तिमत्त्व यामुळे संजय मोने यांनी या शोची धुरा अगदी चोख बजावलेली पाहायला मिळते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ह्या शोला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अल्का कुबल, अभिजित खांडकेकर, रमेश देव, मकरंद देशपांडे, भाऊ कदम,देवदत्त नागे यासारख्या अनेक मराठी कलाकारांनी आजवरचा आपला जीवनपरिचय या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडला आहे.

आपल्या आयुष्यातील चुकांच्या बाबतीतील कानाला लावलेले खडे त्यांनी शेअर केलेले दाखवले. कानाला खडा शोमध्ये ह्या आठवड्यात गौरी सावंत आणि प्रिया बेर्डे हजेरी लावत आहेत तर पुढच्या आठवड्यात खतरनाक हीरोची एन्ट्री झालेली पाहायला मिळणार आहे. हा खतरनाक हिरो म्हणजेच “प्रवीण तरडे ” हजेरी लावताना दिसणार आहे.
त्यामुळे प्रेक्षक देखील ह्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. निलेश साबळे हा चला हवा येऊ द्या मधून प्रवीण तरडे ची नक्कल करताना नेहमीच दिसतो त्यामुळे ह्या भागात प्रवीण तरडे ह्यांचा जीवनप्रवास कसा घडला हे पाहण्याची उत्सुकता जाणवते. प्रवीण सोबत त्याचे आई वडील आणि पत्नी स्नेहल तरडे देखील हजेरी लावताना दिसणार आहेत. ही धमाल मस्ती अनुभवण्यासाठी या भागाची प्रेक्षक निश्चितच वाट पाहणार एवढे नक्की. पुढील आठवड्यात शुक्रवारी तुम्हाला हा भाग झी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *