करण अर्जुन चित्रपटातील ही अभिनेत्री आता दिसते अशी की ओळखनेही झाले कठीण. तर मुलगीही आहे सुंदर

बॉलिवूडमध्ये प्रमुख नायिकेसोबतच आईच्या भूमिका साकारणारी ही अभिनेत्री आहे “राखी गुलजार”.१९९५ साली “करण अर्जुन” चित्रपटातून राखी या सलमान खान, शाहरुख खानची आई बनल्या होत्या. कभी कभी, तपस्या, दाग सारख्या चित्रपटात सुरुवातीला त्यांनी प्रमुख भूमिका बजावल्या. १९६३ साली अजय विश्वास यांच्यासोबत तिने विवाह केला परंतु अवघ्या २ वर्षातच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. १९७३ साली पुन्हा प्रसिद्ध दिग्दर्शक गुलजार यांच्यासोबत त्यांनी दुसरा संसार थाटला.

मुलगी मेघना गुलजार हिच्या जन्मानंतर काही दिवसांनी दोघांनीही घटस्फोट न घेताच वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्या असे म्हणतात की संसार म्हटले की भांडणे ही होणारच त्यामुळेच राखी आजही गुलजार यांच्यासोबत राहत नाहीत. त्यांची मुलगी मेघना गुलजार ही एक दिग्दर्शिका आहे. तिने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या राझी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
राखी आज चित्रपट सृष्टीपासून दुरावलेल्या पाहायला मिळतात. २००९ साली क्लासमेट्स हा अखेरचा चित्रपट त्यांनी साकारला होता. आज त्यांच्याकडे पाहून अनेकांना विश्वास बसत नाही या त्याच राखी आहेत ज्यांनी अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांच्यासोबत नायिकेच्या भूमिका बजावल्या होत्या. त्यांची तब्बेत खालावलेली असल्यामुळे ते अनेक शो आणि फँगशन पासूनही दूरच राहणे पसंत करतात. गेल्या काही वर्षांत त्यांना मिळालेले पुरस्कार हि त्यांना हजार राहून घेता आले नाहीत ह्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *