कमल हसनच्या ह्या अभिनेत्रीचे अखेरच्या दिवसात झाले खूप बेकार हाल. निर्मात्याने जबरदस्तीने ढकलले होते तिला वेश्याव्यवसायात.. फोटो पाहून आश्चर्य चकित व्हाल

फिल्म इंडस्ट्री हे एक असे क्षेत्र आहे ज्याचा मोह कित्येकांना आवरत नाही. ह्याच्या मोहापायी अनेकांनी या क्षेत्रात आपले नशीब आजमावले आहे. परंतु सर्वानाच इथे यश,प्रसिद्धी मिळतेच असे नाही. आज अशाच एका अभिनेत्रीची ओळख करून द्यावीशी वाटते जिने सुरुवातीच्या काळात घवघवीत यश, नाव मिळवले होते आणि एका घटनेमुळे आयुष्याला कलाटणी मिळाल्याने होत्याचे नव्हते झाले. अखेरच्या दिवसात या अभिनेत्रीची परिस्थिती देखील तिला साथ देत नव्हती. जाणून घेऊयात या अभिनेत्रीबद्दल अधिक…

या अभिनेत्रीचे नाव आहे “निशा नूर”. निशा ही ९० च्या दशकातील प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. निशा ची प्रसिद्धी पाहता दाक्षिणात्य सुपर स्टार रजनीकांत, कमल हसन यांनी देखील एके काळी तिच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांची ही ईच्छा देखील अनेक चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण झाली होती. कल्याण अगथीगल, मिमिक ऍक्शन 500, टिक टिक टिक, ईनीमई इधो, अय्यर द ग्रेट सारखे अनेक चित्रपट तिने साकारले. प्रसिद्धीच्या झोतात असतानाच एका निर्मात्याने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिने इंडस्ट्रीमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतला.
चित्रपटापासून बाजूला झाल्यानंतर मात्र निशाला अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले त्यात तिच्यावर वेश्या हा शिक्का बसल्याने आणखीनच परिस्थिती बिकट झाली. यादरम्यान तिला एड्स झाला असल्याचे लक्षात येताच अनेकांकडे तिने मदत मागितली परंतु कोणताही कलाकार तिला पुढे ओळख दाखवू इच्छित नव्हता. ह्या परिस्थिला तोंड देत असतानाच तिच्या आईचा देखील मृत्यू झाला. तिच्या शेवटच्या दिवसात ती नागोर येथील दर्ग्याच्या रस्त्याच्या ठिकाणी एका बिकट अवस्थेत आढळली. आजारपणामुळे तिचे शरीरही तिला साथ देत नव्हते. अक्षरशः तिच्या शरीरावर किड्या मुंग्यां रेंगत होत्या. तशा अवस्थेतच तिला एका सरकारी दवाखान्यात दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार चालू असतानाच अखेर २००७ रोजी निशा नूरने या जगाचा निरोप घेतला.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *