काही वर्षापूर्वी “हरे कृष्ण डायमंड कंपनी”ने आपल्या ६०० कर्मचाऱ्यांना कार तर ११०० कर्मचाऱ्यांना घर देऊन ही कंपनी भारतभर चर्चेचा विषय ठरली होती. केवळ एवढेच नाही तर दिवाळी बोनस म्हणून कंपनीने ३ मॅनेजरला मर्सिडीज देऊ केली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ही कंपनी आपल्या एम्प्लॉईज साठी गिफ्ट म्हणून घर, कार, दागिने, बँक एफडी बक्षीस स्वरूपात अशी गिफ्ट देत आहेत. या कंपनीचे मालक आहेत “सावजी ढोलकिया”. सुरत येथे त्यांनी ही कंपनी मोठ्या कष्टाने उभारली असल्याचे सांगितले जाते. जगभरातील तब्बल ७१ देशात त्यांच्या डायमांडचा व्यापार पसरलेला आहे.

हरे कृष्ण डायमंड कंपनीत नोकरी मिळण्यासाठीची अट- या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी काही अटी घालण्यात येतात. कंपनीत कार्यरत असलेल्या ८००० एम्प्लॉईज पैकी कुणा एकाची ओळख असणे आवश्यक आहे. त्याच्या शिफारशीनुसारच काम करू इच्छिणाऱ्यास एक अर्ज भरून द्यावा लागतो. पुढे मुलाखतीतून त्यांची निवड केली जाते. अगदी १० पास असणारे तसेच पदवीधर असणारे कर्मचारी देखील या कंपनीत जवळपास ३० हजार रु एवढा पगार कमावू शकतात. त्यासाठी तुमच्याकडे डायमंड प्लॅनिंग, कटिंग, पोलिशिंग याचे कौशल्य असणे आवश्यक असते. त्याच्या आधारावर तो कर्मचारी अगदी १ लाखापर्यंत कमाई करू शकतो. येथील काही एम्प्लॉईज तर या कौशल्याच्या जोरावर तब्बल ५ लाखांपर्यंत पगार कमावतात.
कंपनीत मिळणाऱ्या सुविधा
१. कंपनीतील एम्प्लॉईजला वर्षाला१ लाखापर्यंतचा हेल्थ इन्शुरन्स तसेच मृत्यूनंतर १ कोटी रु देण्यात येतात. २. वर्षात दोन युनिफॉर्मसोबत बसची सुविधा पुरवते. ३. क्रिकेट ग्राउंड, स्विमिंग, जिम, योगा यांच्यादेखील सुविधा दिल्या जातात. ४. एम्प्लॉईजच्या मुलांच्या शिक्षणाचा, पुस्तकांचा खर्च देखील ही कंपनी स्वीकारते. ५. कामगारांना आठवड्यातून ५ दिवस दुपारचे जेवण मोफत तर शनिवारी टिफिन डे आयोजित करतात.
६. ३ वर्षातून एकदा कुटुंबियांसाठी सहलीचे आयोजन केले जाते. ७. इतर सणांव्यतिरिक्त दिवाळीच्या दिवसात १५ ते २० दिवस सुट्टी दिली जाते.
८. समर व्हॅकेशन साठी १० दिवसांच्या सुट्ट्या दिल्या जातात. कंपनी सोडणाऱ्या एम्प्लॉईजची टक्केवारी देखील इथे नगण्यच म्हणावी लागेल. अगदी मंदीच्या काळात देखील या कंपनीने आपल्या एम्प्लॉईजला कार, घर, दागिने दिले असल्याने आणि वरील सुविधा पाहिल्यास कुठल्याही एम्प्लॉईला ही नोकरी सोडावी अशी ईच्छा होणार नाही. त्यामुळे इथे काम करणारा प्रत्येक व्यक्ती नशिबवानच म्हणावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *