एक्झिट पोलच्या निकालानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ” या अभिनेत्याला” जीवे मारण्याची धमकी निकालानंतर जीवे मारण्याची धमकी

एक्झिट पोलचे निकाल जाहीर होताच बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे एक वादग्रस्त मिम प्रसिद्ध केले होते. त्यामुळे सर्वच स्तरातून त्याच्या या वागण्याला विरोध होताना दिसला. अगदी सोनम कपूरने देखील त्याच्या या वागण्याचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर विवेक ओबेरॉयने माफी मागत ते मिम हटवले . परंतु विवेक ओबेरॉय आता आणखी एका अडचणीत सापडला असल्याचे चित्र दिसत आहे. नुकताच त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे समोर येत आहे.

यासंदर्भात त्याने मुंबई पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे विवेकच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मोदींच्या बायोपिकवर आधारित चित्रपट बऱ्याच अडचणीनंतर २४ मे रोजी प्रदर्शित होत आहे त्यामुळे विवेक सध्या चांगलाच चर्चेत राहिला आहे. चित्रपटावरही बरीच जणांनी आक्षेप घेतले होते. राज ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रात चित्रपट होऊ देणार नाही असे सांगितले होते पण आता निवडणूक निकाल जाहीर होता न होताच त्याला जीवे मारण्याच्या धमकीमुळे विवेक ओबेरॉय चांगल्याच अडचणीत आलाय आणि त्याने ह्या कारणामुळेच पोलीस स्टेशन गाठून त्याबात गुन्हा दाखल करून घेतलाय.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *