चंदेरी दुनियेत आपले करिअर घडवून आणण्यासाठी अनेक नवोदित कलाकारांना खूप वाईट अनुभवाला सामोरे जावे लागते. आजच्या घडीला ह्यातील अनेक कलाकार नावारूपास आलेले पाहायला मिळतात. पर्यायाने या अभिनेत्रींना आपल्या सुरुवातीच्या काळात कास्टिंग काऊच किंवा वन नाईट स्टँडला सामोरे जावे लागते. मराठी सिने जगतात हे प्रमाण खूप कमी वाटत असले तरी बॉलिवूडसारख्या क्षेत्रात हे असे घडलेले आपण नेहमीच ऐकतो. अशाच प्रकारे मराठीतील एका नावारूपास आलेल्या अभिनेत्रीने देखील हा अनुभव शेअर केला आहे. मराठीतील ही अभिनेत्री आहे “श्रुती मराठे”.

श्रुती मराठे ह्या अभिनेत्रीने वयाच्या १६ व्या वर्षापासूनच सिने क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी तिला एक दाक्षिणात्य चित्रपट साकारण्याची संधी मिळाली.चित्रपटासाठी तिला बिकनी घालण्यास सांगितले होते. ही खरंच चित्रपटाची गरज आहे का? असा कुठलाच प्रश्न त्यावेळी तिच्या मनात आला नाही. मला काम मिळते हेच तिच्यासाठी त्याक्षणी खूप महत्वाचे होते. त्यादरम्यान मराठीत तिने चांगले नाव कमावले असल्याने तिच्या या बिकीणीतील फोटोवर अनेकांनी टीका झोडल्या होत्या. इथे तिला अनेक चाहत्यांनी ट्रोल केले होते.
एका निर्मात्याने त्यावेळी तिच्यासमोर शरीर सुखाची मागणी घातली. कुठलाही विलंब न घाबरता तिने त्याला प्रतिउत्तर दिले,’ एका अभीनेत्रीला काम मिळण्यासाठी झोपावे लागत असेल तर एका हिरोला काम मिळावे म्हणून तुम्ही काय करता.’ असे उत्तर मिळाल्यावर तो निर्माता भांबावला. लगेचच तिने ही घटना आपल्या जवळच्या मित्रांजवळ तिने फोनवरून कळवली. त्यांनी तिला तिथून निघण्याचा सल्ला दिला. हातातील प्रोजेक्ट तिने त्याक्षणी सोडून दिला. यासोबतच तिने अनेक अनुभव आपल्या इन्स्टाग्राम वरून व्यक्त केले आहेत. तिच्या त्या फोटोबाबत देखील तिने तिची भावना व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *