एका चुकीमुळे ह्या अभिनेत्रीचे करिअर आले संपुष्टात…वाचून आश्चर्य वाटेल

बॉलिवूडमध्ये मिळेल ते काम करत राहणे आणि आपले अस्तित्व टिकवून ठेवणे हे कदापि सोपे काम नव्हे. परंतु मिळत असलेल्या भूमिकेमुळे जर तुमच्या करिअरवर प्रभाव पडत असेल तर नक्कीच अशा गोष्टींचा विचार करावा लागतो. असेच काहीसे घडले आहे ह्या अभिनेत्रीबद्दल, जिने अनेक विविध भूमिका साकारून मोठ्या संघर्षातून बॉलिवूडमध्ये आपले स्थान टिकवून ठेवले होते परंतु तिच्या एका निर्णयामुळे तिला आपल्या करिअरवर पाणी सोडावे लागल्याचे दिसते आहे. बॉलिवूडच्या ह्या अभिनेत्रीचे नाव आहे “रिमी सेन”.

रिमी सेनेने आपले शिक्षण झाल्यानंतर मोठ्या कष्टाने मॉडेलिंग तसेच व्यावसायिक जाहिरातीत आपले स्थान निर्माण केले होते. ह्याच मुळे तिला अनेक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. हंगामा हा तिने साकारलेला पहिला बॉलिवूड चित्रपट. अक्षय खन्ना, आफताब शिवदासानी आणि रिमी सेन यांचे त्रिकुट असलेल्या चित्रपटाने चांगले यश मिळवले होते. दिवाने हुये पागल, क्युकी, गरम मसाला, धूम, फिर हेरा फेरी, गोलमाल अनलिमिटेड सारख्या चित्रपटात तिला अक्षय कुमार, सलमान खान, अभिषेक बच्चन सोबत काम मिळाले. बहुतेक चित्रपटात तिने बोल्ड भूमिका देखील साकारलेल्या पाहायला मिळाल्या. तिला अनेक उत्तम चित्रपट मिळाले त्या सर्वात तिने छान भूमिका मांडल्या खऱ्या परंतु पुढेही एकाच धाटणीच्या भूमिका मिळत गेल्याने तिला त्याच त्याच भूमिका करण्याचा कंटाळा आला. एका वळणावर मात्र तिने चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. तिचा हाच निर्णय तिचे करिअर संपुष्टात येण्यास कारणीभूत ठरला असे म्हणायला हरकत नाही. कारण यानंतर तिने स्वतःचे प्रोडक्शन हाउस उभारण्याचा निर्णय घेतला .
२०१५ साली “बुधीया सिंह: बॉर्न टू लर्ण” सारख्या चित्रपटाची निर्मिती केली. ह्या चित्रपटाला त्या वर्षीचा बेस्ट चिल्डरण फिल्म म्हणून नॅशनल अवॉर्डही मिळाला. परंतु एक अभिनेत्री म्हणून तिला जे यश मिळाले होते तेवढे यश मात्र तिला न मिळाल्याने तो एक निर्णय चुकीचा ठरला असल्याचे तिने एका मुलाखतीतून स्पष्ट केले होते. चित्रपटात काम मिळत असतानाही तो एक निर्णय खूप मोठे नुकसान करून देणारा ठरला असल्याचे तिने व्यक्त केले होते. त्यामुळे मिळेल ते काम करत राहणे आणि आपले अस्तित्व टिकवून ठेवणे यातच खरे शहाणपण याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *