“उदयनराजे” यांनी हस्तक्षेप करूनही मराठी सिनेमाच्या निर्मात्यावर आली अक्षरशः रडण्याची वेळ

गेल्या अनेक दिवसांपासून “फाईट” या मराठी ऍक्शनपट चे प्रमोशन जोरदार सुरू असतानाच एका बातमीने या चित्रपटाच्या निर्मात्यावर अक्षरशः रडत बसण्याची वेळ आली आहे. मराठमोळा रांगडा अभिनेता जित मोरे, सायली जोशी, पूर्वा शिंदे, कमल ठोके अशी नवीन कास्ट असलेला मराठी चित्रपट डिसेंबर महिन्यातच प्रदर्शित होणार होता परंतु बिग बाजेटवाल्या चित्रपटामुळे त्यांनी हा चित्रपट उद्या म्हणजे ११ जानेवारी २०१९ रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित करण्याचे ठरवले. खरं तर या चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच हा चित्रपट कधी पाहायला मिळणार याची उत्सुकता अनेकाना लागून राहिली होती. एवढेच नाही तर अगदी विदेशातील मराठी लोकांनीही हा चित्रपट तिथे प्रदर्शीत करण्याची मागणी केली होती.

परंतु चित्रपट पाहिला मायभूमीत सादर व्हावा ही प्रोड्युसर ललित ओसवाल यांची अपेक्षा होती. यासाठी त्यांनी खूप मेहनतही घेतली असल्याचे एका मुलाखतीत सांगितले. परंतु काल संध्याकाळी ह्या चित्रपटाला एकही स्क्रीन मिळणार नसल्याचे थेटर मालकांनी वाजवले. हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार म्हणून अगोदरच या टीमने संपूर्ण तयारी केली होती. रिक्षांवरील बॅनर, पासेस त्यांनी अगोदरच वितरित केल्याने या निर्मात्यावर अक्षरशः रडत बसण्याची वेळ आली आहे. जवळपास ४ कोटींचा या चित्रपटासाठी लावण्यात आल्याने त्यांना या मुलाखतीत काय बोलावे हेच सुचत नव्हते.
११ तारखेला दोन मोठे हिंदी चित्रपट येत असल्याने थेटर मालकांच्या या मुजोरीला कसे सामोरे जावे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित झाला आहे. महाराष्ट्रात मराठी सिनेमाला थेटर मिळत नाही ही खूप खेदाची बाब म्हणावी लागेल. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन यासंबधीचे पत्र ही थेटर मालकांना पोहोचवले. परंतु तरीदेखील या पत्राची थेटर मालकांनी दखल घेतली नाही. उद्या कुठल्याही परिस्थितीत चित्रपट प्रदर्शित व्हावा म्हणून जनतेला त्यांनी आवाहन केले आहे. यासंबंधी अनेक कलाकारांनी फेसबुक च्या माध्यमातून या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करण्या करता सर्वानीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात तुमचेही मत लवकरात लवकर कमेंटद्वारे कळवून जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून याचित्रपटाच्या प्रदर्शनाला कुठलीतरी मदत मिळेल.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *